Health Tips for Periods During Office: कार्यालयीन कामकाजादरम्यान मासिक पाळी ही स्त्रीसाठी अत्यंत वेदनादायी घटना असते. कामाच्या दरम्यान मासिक पाळीमुळे स्त्रीला शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागते. (periods during office these are some tips to follow use it and keep relax at work lifestyle)
ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं. तुम्हाला मासिक पाळी दरम्यान खूप लाजिरवाणे आणि विचित्र परिस्थितीतून जावे लागणार नाही त्यासाठी खालील टीप्स तुम्हाला उपयोगी ठरतील कारण जर तुम्हाला सतत असा प्रश्न पडत असेल की कामाच्या ठिकाणी पाळी आली तर काय करायचं? तर चिंता करू नका या टीप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.
अशावेळी तुम्ही तुमच्या सहकारी स्त्रियांना विश्वासात घ्या आणि अशावेळी अजिबात घाबरून जाऊ नका. जरी मासिक पाळी येणे ही सर्व महिलांसाठी एक रूटीन गोष्ट आहे परंतु कधीकधी जास्त वेदनांमुळे कामावर परिणाम होतो. त्यामुळे कामाच्या वेळी पाळीत होणारा तास तुम्ही असा नक्कीच हॅन्डल करू शकता.
सॅनिटरी पॅड बॅगेत ठेवा -
मासिक पाळीच्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅडचा वापर. तुम्हाला पॅड बदलण्याची आवश्यकता असल्यास तुमच्या बॅगमध्ये अतिरिक्त पॅड असावेत. पॅड बदलल्यानंतर पुन्हा काम करण्यासाठी बसता येते.
सैल कपडे निवडा -
पीरियड्स दरम्यान ऑफिसमध्ये सैल कपडे घालता येतात. त्यामुळे अस्वस्थता वाढणार नाही आणि कामावरही परिणाम होणार नाही. पीरियड्स दरम्यान ऑफिसमध्ये स्कर्ट घालता येतात. मासिक पाळीत घट्ट कपडे तुम्हाला वेदनादायी ठरू शकतात.
भरपूर पाणी प्यावे -
पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. पुरेसे पाणी न पिल्याने सुस्ती येते. पाणी प्यायल्याने स्नायू आणि त्वचा देखील कार्यक्षमतेने काम करतात. हे मासिक पाळी दरम्यान वेदना आणि सूज दोन्ही कमी करण्यास मदत करते. यामुळे पीरियड्सच्या काळात ऑफिसची कामे करणे अवघड जात नाही.
पाठीला आधार द्या -
बसताना पाठ आरामशीर स्थितीत ठेवून काम करा जेणेकरून पाठदुखीच्या काळात पाठ आरामदायी स्थितीत राहील. मागील बाजूस अतिरिक्त वेदना झाल्यामुळे मासिक पाळीमध्ये काम करताना देखील समस्या उद्भवू शकतात.
नियमित शरीर ताणा -
दिवसभर बसून काम करताना काही मिनिटे नियमितपणे हालचाल करणे आणि शरीर ताणणे विसरू नका. पीरियड्समध्येही योगासने मदत करतात. यामुळे एकाग्रता राहून मन शांत राहते.
(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)