पनीरचा शोध कसा लागला? 'ही' रंजक कहाणी तुम्हाला माहिती आहे का?

काही इतिहासकारांनी आणि परदेशी आहारतज्ज्ञांनी पनीर हे परदेशाची शोध आहे असं म्हणायचा प्रयत्न केला आहे. 

Updated: Aug 22, 2022, 12:48 PM IST
पनीरचा शोध कसा लागला? 'ही' रंजक कहाणी तुम्हाला माहिती आहे का? title=
paneer history and interesting facts need to know trending news in marathi

Paneer: भारतात अनेक लोक हे पनीरप्रेमी आहेत. शाकाहारी असो वा मांसाहारी पनीर आवडतं नाही, असा म्हणणारा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. कॅल्शिअम आणि प्रोटीनसाठी डॉक्टर पनीर खाण्याचा सल्ला देतात. भारताला सोन्याचा पक्षी असं म्हटलं जातं. कारण भारतात दुध-दह्याच्या नद्या वाहतात असं म्हटलं जातं. भारतीय खाद्य संस्कृतीत दूध-दही आणि लोणीला विशेष महत्त्वं आहे. 

भारतातील कुठलेही सण असो किंवा लग्न सोहळा पनीरशिवाय पूर्ण होत नाही. अशात पनीरचा शोध कुठून लागला असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल आणि तुम्ही पनीरप्रेमी असाल तर पनीरचा शोधाची रंजक कहाणी तुम्हाला माहिती असायला हवी. पनीरचा शोध नेमका भारत की देशाबाहेरील आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. (paneer history and interesting facts need to know trending news in marathi)

पनीरचा शोध कसा लागला?

इतिहासकार सांगतात की, पनीरचा शोध हा 17व्या शतकात भारतातील बंगालमध्ये लागला. दुधात सायट्रीक अॅसिडीची प्रक्रिया करुन पनीर तयार करण्याचा शोध हा त्यावेळी पोर्तुगीजांनी लावला. त्यानंतर बंगालमध्ये दूध फाडून पनीर बनवण्याची सुरुवात झाली. पनीरला छेना या नावानेही ओळखलं जातं. तर पनीर हा एक पर्शियन शब्द आहे. तर परदेशात पनीरला चीझ म्हणून ओळखलं जायचं. तर आता परदेशात कॉटेज चीझ म्हणून पनीर ओळखलं जातं आहे. म्हणून पनीरचा शोध भारतात लागला आणि भारतीयांना पनीर बनविण्याची कला पोर्तुगीजांनी शिकवली असं म्हणता येईल. 

काही इतिहासकारांनी आणि परदेशी आहारतज्ज्ञांनी पनीर हे परदेशाची शोध आहे असं म्हणायचा प्रयत्न केला आहे. मात्र मुघल सम्राट अकबराच्या काळातील अकबरनामामध्ये पनीरचा उल्लेखही तुम्हा दिसून येईल. त्यानंतर आज भारतात मोठ्या प्रमाणात पनीरचा वापर केला जातो. पनीरपासून भारतात अनेक पदार्थ बनवले जाता. मिठाईमध्येही पनीरचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पनीरचं सेवन जास्त केल्यास तुमचं कोलेस्टेरॉल वाढू शकतं.  याशिवाय एक किलो पनीर बनविण्यासाठी आपल्याला 5 लीटर दुधाची आवश्यकता असते. 

या ग्रंथात पनीरचा उल्लेख 

भारतातील इसवी सन पूर्व सातव्या-आठव्या शतकात लिहिलेल्या 'चरकसंहिता' या आयुर्वेदिक ग्रंथात  पनीरचा उल्लेख असल्याचं म्हटलं गेलं आहे. या ग्रंथात गाय, म्हैस, उंट, घोडी, गाढव, शेळी यांच्या व्यतिरिक्त हत्तीच्या दुधाचे गुण-दोष सांगण्यात आले आहे. या ग्रंथाच्या शेवटच्या श्लोकात 'तक्राकुर्चिका' वर्णन केलं गेलं आहे. यात दूध उकळताना त्यात काही 'द्रव' टाकून ते फुटते, असं म्हटलं आहे. या प्रक्रियेला 'तक्राकुर्चिका' असं म्हणतात. याचा अर्थ 'तक्राकुर्चिका' म्हणजे पनीर असो इतिहासकारांचं म्हणं आहे.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)