नवीन पदार्थ चाखण्याची इच्छा नही, 'या' आजाराचे संकेत

फिनलॅंडमधील 'हेलसिंकी विद्यापीठ' आणि एस्टोनेशियामधील 'यूनिव्हर्सिटी ऑफ टार्टू'च्या संशोधकांचा शोध...

Updated: Jun 20, 2019, 08:42 AM IST
नवीन पदार्थ चाखण्याची इच्छा नही, 'या' आजाराचे संकेत title=

नवी दिल्ली : नवनवीन पदार्थांचा अस्वाद घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते. परंतु काही मंडळी या गोष्टीसाठी अपवाद असातात. काहींना नवीन पदार्थांची चव चाखायला देखील आवडत नाही. अशा व्यक्तींना 'फूड नीओफोबिया'ची समस्या असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही समस्या मुख्यत: ह्रदय विकार त्याचप्रमाणे मधुमेह २ असलेल्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. या आजारामध्ये रूग्ण नवीन पदार्थांची चव घेण्यास नकार देतो. 

फिनलॅंडमधील 'हेलसिंकी विद्यापीठ' आणि एस्टोनेशियामधील 'यूनिव्हर्सिटी ऑफ टार्टू'च्या संशोधकांनी आहाराची गुणवत्ता, जीवनशैलीसह संबंधित आजार आणि जोखीमांवर संशोधन केले. आहारातील सवयी, जीवनशैलीशी संबंधित रोगांचा प्रभाव आणि आहाराच्या वर्तनासंबंधी त्यांच्या जोखीम घटकांचा अभ्यास करण्यात आला आहे.

तब्बल सात वर्ष सुरू असलेल्या या संशोधनात २५ ते ७४ वयोगटातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. 'फूड नीओफोबिया' हा आजार ७८ टक्के अणुवांशिक असल्याचे अहवालात सादर करण्यात आले आहे. हा आजार लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये आढळून येतो.