Mumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर

Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो. 

नेहा चौधरी | Updated: May 24, 2023, 10:45 AM IST
Mumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर  title=
Mumbaikar heart attack 26 lives and cancer 25 lives in a day in mumabi 2022 rti report marathi news

Heart Attack And Cancer Report in Mumbai : मुंबई घडाळ्याच्या काट्यावर चालते. मायानगरी मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धावत असतो. मात्र मुंबईची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. मुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे 26 तर कॅन्सरमुळे 25 जणांचा मृत्यू होतोय. 2022 या वर्षात मुंबईत हार्ट अॅटॅकनं सर्वाधिक मृत्यू झाल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.  मुंबईला ह्रदयविकार आणि कॅन्सरचा विळखा पडलाय. 

कशी आली ही आकडेवारी समोर?

2022 मध्ये कोरोनाने कमी तर ह्रदयविकार आणि कॅन्सर यामुळे मुंबईकरांचे जीव गेले आहेत. 2022 मध्ये कुठल्या विकारामुळे किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती RTI म्हणजेच माहितीच्या अधिकारात मागविण्यात आली होती. मुंबईकर चेतन कोठारी यांनी ही माहिती आरोग्य विभागाकडून मागितली होती. या अहवालातून हा धक्कादायक आकडा समोर आला. कोरोना या आजारामुळे 2020 या वर्षात 10 हजार 289 जणांचा बळी गेला. तर 2021 मध्ये 11 हजार 105 आणि 2022 मध्ये 1891 मुंबईकरांनी आपले प्राण गमावले. पण हार्ट अटॅकमुळे रोज 26 मुंबईकरांना जीव गमवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. (Mumbaikar heart attack 26 lives and cancer 25 lives in a day in mumabi 2022 rti report marathi news)

ह्रदयविकारमुळे किती जणांचा बळी गेला ती आकडेवारी पाहुयात

वर्ष---मृत्यू

2018---8601
2019---5849
2020---5633
2022---9470

पाहा आकडेवारी

मुंबईत कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही हादरवून सोडणारं असल्याचं केईएमचे कार्डीयोलॉजी विभागचे प्रमुख डॉ. अजय महाजन म्हणाले. 

पाहा काय म्हणाले डॉक्टर

हार्ट अटॅकप्रमाणेच कॅन्सरचाही धोका मुंबईकरांवर दिवसेंदिवस वाढ असल्याच चित्र आहे. कॅन्सरमुळे आता पर्यंत किती जणांनी जीव गमावल्या आहेत ती आकडेवारी पाहूयात.

मुंबईला कॅन्सरचा विळखा 

वर्ष---मृत्यू

2018---10073
2019---9958
2020---8576
2022---9145

पाहा आकडेवारी

धकाधकीची जीवनशैली, अवेळी जेवण, धावपळ, झोप न होणं, सार्वजनिक ठिकाणची गर्दी या साऱ्याचा दुष्परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय. कॅन्सर आणि ह्रदयरोगामुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा बळी जातोय. त्यामुळे मुंबईकरांनो आपलं आरोग्य सांभाळा.