उल्हासनगर हादरले! 6 वर्षांच्या चिमुरडीवर बाप-लेकानेच केला लैंगिक अत्याचार

Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एका 6 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 23, 2025, 08:19 AM IST
उल्हासनगर हादरले! 6 वर्षांच्या चिमुरडीवर बाप-लेकानेच केला लैंगिक अत्याचार title=
man and his son molested six-year-old girl in Ulhasnagar

Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात महाराष्ट्रात महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उल्हासनगरमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बाप-लेकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. शेजारी राहणाऱ्या बाप-लेकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बाप-लेकाचा अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडीची आई इतरांच्या घरी घरकामासाठी जात होती. तर, तिचे वडील हातमजुरीचे काम करत होते. पीडितेचे आई-वडील कामाला गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या आरोपींनी पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवले. त्यानंतर 12 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मजुरी करणाऱ्या बापाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. 

बुधवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीच्या आईला संशय आला. आईने मुलीला खोदून खोदून तिने शेजारी राहणाऱ्या बाप-लेकाचे नाव घेत त्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. सध्या या पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलगा आणि बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तसंच, या दोन्ही बाप-लेकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अपहरण केलेल्या मुलाची 4 तासात सुटका

पंढरपूर तालुक्यातील देगाव येथून २४ वर्षीय मुलाचे जबरदस्तीने अपहरण करणाऱ्या दोघांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासात ताब्यात घेऊन मुलाची सुखरूप सुटका पोलीस निरीक्षक टी आय मुजावर यांच्या पथकाने केली आहे. अपहरण झालेला मुलगा वीट भट्टीवरील कामासाठी पाच लाख रुपयांची उचल घेऊन गावी आला होता. आरोपींनी त्याला अनेकदा संपर्क करून कामावर ये किंवा रक्कम दे यासाठी तगादा लावला होता. दोन्ही गोष्टी होत नसल्याने आरोपींनी सदर मुलाला जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत घालून नेले. पोलिसांना माहिती मिळताच अवघ्या चार तासात अपहरण झालेला मुलगा आणि आरोपींचा शोध पोलिसांनी घेतला आहे.