तेलकट त्वचेचा त्रास दूर करेल 'हा' खास पॅक!

पुदीना फक्त आरोग्यदायी आहे असे नाही तर तो सौंदर्यवर्धकही आहे.

Updated: Jul 27, 2018, 03:16 PM IST
तेलकट त्वचेचा त्रास दूर करेल 'हा' खास पॅक! title=

मुंबई : पुदीना म्हटलं की त्याचा पहिल्यांदा त्याचा गंध आठवतो आणि मग त्याची चटपटीत चटणी लक्षात येते. पुदीना आरोग्यदायी असून अनेक ड्रिंक्समध्ये त्याचा वापर केला जातो. पोटाला थंडावा देण्यासाठी पुदीना गुणकारी ठरतो. 

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी पुदीना उपयुक्त ठरतो. पण पुदीना फक्त आरोग्यदायी आहे असे नाही तर तो सौंदर्यवर्धकही आहे.

त्वचेसाठी लाभदायी असलेला पुदीना नेमका कसा वापरावा, पाहुया...

# पुदीन्यात मिंथॉल आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. पिंपल्स, रॅश, घामोळ्या, सनबर्न यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीन्याची पाने उपयुक्त ठरतात. 

# मुलतानी माती देखील त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचेतील ऑईल नियंत्रित करून त्वचा स्वच्छ करण्याचे काम मुलतानी माती करते. मुलतानी मातीत पुदीन्याची पान्यांची पेस्ट, मध, दही घालून त्वचेवर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवा. त्यानंतर त्वचेवर मॉईश्चरायजर लावा. तेलकट त्वचेचा त्रास कमी होईल.

# त्वचेची पीएच लेव्हल सुरळीत ठेवण्यासाठी, अतिरिक्त ऑईल नियंत्रित करण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरते. त्यामुळे पुदीन्याची पाने, मध आणि गुलाबपाणी एकत्र मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. त्वचा मुलायम होईल व हायड्रेट राहिल. 

mint is beneficial for oily skin