शारीरिक संबंधांदरम्यान Period Blood मुळे पुरुषांना होऊ शकतं इंफेक्शन?

मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध (Physical Realation) ठेवावे का की ठेवू नयेत, यासंदर्भात अनेक समजुती आहेत.

Updated: Dec 2, 2022, 05:47 PM IST
शारीरिक संबंधांदरम्यान Period Blood मुळे पुरुषांना होऊ शकतं इंफेक्शन? title=

Physical Relation during Periods : मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवावे का की ठेवू नयेत, यासंदर्भात अनेक समजुती आहेत. मेडिकल सायन्सच्या (Medical Science) मताप्रमाणे, मासिक पाळी (Periods) म्हणजेच पिरीयड्ससंदर्भात शारीरिक संबंध म्हणजेच सेक्स (Sex) करणं पूर्णपणे सुरक्षित आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या गोष्टीचा कोणताही पुरावा नाही की, पिरीयड्स दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने कोणती समस्या ओढावते. 

पिरीड्सदरम्यान फिजिकल रिलेशन ठेवल्याने दोन गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये पहिलं म्हणजे पार्टनरची सहमती आणि दुसरं म्हणजे प्रोटेक्शन.

पीरियड्समध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने कोणते आजार होऊ शकतात?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीरियड्समध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने महिला आणि पुरुष दोघांनाही एसटीआय ( Sexually Transmitted Infection) चा धोका असतो. 

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पीरियड्सच्या वेळी महिलांचं सर्विक्स (Cervix) म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचं तोंड जास्त प्रमाणात उघडं असतो. यावेळी वजायनाचा  पीएच बॅलंस (PH balance) असामान्य असतो. अशामध्ये महिलांमध्ये बॅक्टेरियल आणि वायरल इंफेक्शनचा धोका अधिक असतो. खासकरून (Pelvic Inflammatory Disease) हा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

पीरियड ब्लडमुळे पुरुषांना होऊ शकतं इंफेक्शन? (Can a man get sick from period blood?)

मासिक पाळीमध्ये फिजिकल रिलेशन ठेवल्याने पीरियड्सच्या ब्लडमुळे पुरुषांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो का? या प्रश्नावर तज्ज्ञ म्हणतात, असं बिलकूल नाहीये. पुरुष आणि महिला या दोघांनाही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज (STI) चा सामन्यपणे धोका असतो. यासाठी या काळामध्ये फिजिकल रिलेशन न ठेवणं फायदेशीर ठरतं. किंवा तुम्ही कंडोम किंवा डेंटल डँम्सचा (Dental Dams) वापर करू शकता.

STI ची 5 लक्षणं (What are 5 STD symptoms?)

  • प्रायवेट पार्टमध्ये दुर्गंधी येणं
  • सतत खाज येणं
  • शारीरिक संबंध ठेवताना वेदना होणं
  • गाठ किंवा जखम होणं 
  • लघवी करताना वेदना होणं