मेडिटेशनच्या वेळी केल्या जाणाऱ्या या साध्या-साध्या चुका तुमची मेहनत पाण्यात घालवतात

निरोगी आरोग्यासाठी मेडिटेशन करणं फार गरजेचं असतं.

Updated: Jun 3, 2021, 01:48 PM IST
 मेडिटेशनच्या वेळी केल्या जाणाऱ्या या साध्या-साध्या चुका तुमची मेहनत पाण्यात घालवतात title=

मुंबई : मेडिटेशन करणं हे निरोगी आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं. केवळ शारीरिक आरोग्य नव्हेच तर मानसिक आरोग्यासाठी देखील मेडिटेशन करणं फार गरजेचं असतं. नियमितरित्या मेडिटेशन केल्याने तणाव, चिंता तसंच चिडचिडेपणा यापासून दूर राहण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे आपलं ध्यान केंद्रित होऊन शक्ती वाढण्यासही मदत होते. मात्र अनेकदा लोकं मेडिटेशन करताना अनेक चुका करतात. यामुळे मेडिटेशनचा फायदा तितकासा होत नाही. जाणून घेऊया मेडिटेशन करताना कोणत्या चुका होतात.

1. मेडिटेशन एक प्रक्रिया आहे ज्याचे अनेक पैलू आहेत. हे सर्व पैलू मेडिटेशन करत असणाऱ्या व्यक्तीला माहिती असले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला सर्व पैलू माहिती नसतील तर तुम्ही योग्य पद्धतीने ध्यान लावू शकणार नाही.
2. मेडिटेशन करताना तुमच्या शरीराची ठेवणं तितकीच महत्त्वाची असते. जर मेडिटेशन करताना तुमच्या शरीराची ठेवण चुकीची असेल मेडिटेशनचा लाभ मिळणं कठीण आहे. मेडिटेशनच्या अधिकतर पद्धतींमध्ये तुमची पाठ आणि कंबर सरळ असणं गरजेचं आहे.
3. मेडिटेशन करताना अनियमितता ठेवणं ही चूक अनेकजण करताना दिसतात. तुम्ही दररोज मेडिटेशन केलं पाहिजे. जर तुम्ही मेडिटेशनचे सेशन मध्ये सोडून देत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही.
4. नियमितरित्या मेडिटेशन करण्यासोबतच त्याची वेळंही निश्चित करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही दररोज नियमितपणे मेडिटेशन कराल मात्र विविध वेळेत केल्यास त्याचे पुरेसे फायदे मिळणार नाहीत. मेडिटेशन करण्यासाठी सकाळची वेळ फार योग्य मानली जाते.
5. मेडिटेशन करताना शक्यतो डोक्यात इतर विचार आणू नये. मेडिटेशन करताना जर तुम्ही भविष्याची चिंता करत असाल तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते.