Lemon Water: डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी ठरतं का फायदेशीर?

लिंबूपाण्याला सर्वोत्तम डिटॉक्स वॉटर म्हटलं जातं. 

Updated: May 7, 2022, 08:17 AM IST
Lemon Water: डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी ठरतं का फायदेशीर? title=

मुंबई : लिंबूपाणी हे एक सामान्य आणि लोकप्रिय पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण या पेयाचा वापर करतात. लिंबू पाणी पचन आणि वजन संतुलित करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं आरोग्यदायी असल्याचं म्हटलं जातं. 

लिंबामध्ये पेक्टिन फायबर असतं, ज्यामुळे आपल्या शरीराला भूक लागत नाही. म्हणूनच लिंबूपाण्याला सर्वोत्तम डिटॉक्स वॉटर म्हटलं जातं. याशिवाय लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासही मदत करतं.

लिंबाने कसं होतं वजन नियंत्रणात?

लिंबूपाण्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. याशिवाय लिंबूपाणी प्यायल्याने लोकांना लवकर भूक लागत नाही आणि पोट बराच वेळ भरलेलं वाटतं. हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, लिंबू पाण्यातही लोकांना हायड्रेट ठेवण्याची ताकद असते. 

2008 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्चनुसार, अन्न खाण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरात 13 टक्के कॅलरीज कमी होतात. इतर संशोधनातून हे सिद्ध झालं की, शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवून, व्यक्ती कोणत्याही व्यायामाशिवाय देखील वजन कमी करू शकतं. 

लिंबू पाण्याचे इतर फायदे

लिंबूपाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय कोमट लिंबू पाणी प्यायल्याने घसादुखीपासून आराम मिळतो. त्याचबरोबर लिंबू पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून प्यायल्याने हिरड्यांची समस्याही दूर होतात.