मुंबई : भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच. लवंग हा असाच एक मसाल्याचा औषधी पदार्थ. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे...अनेक आजार आहेत ज्यावर औषध म्हणून आयुर्वेदात घरगुती पदार्थ मग त्यात मसाले असो किंवा इतर अन्नपदार्थ यांचा रामबाण उपाय म्हणून वापर सांगण्यात आला आहे.
सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज ३-४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.
लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी २ लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्या. असे रोज तीन वेळा केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल. गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर गुणकारी ठरेल.
लवंगामध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मळमळ, उलटीसारखे वाटणे, यावर लवंग चघळणे फायदेशीर ठरते. कारण गर्भारव्यस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ जाणवते. यावर लवंगासारखे दुसरे औषध नाही.
लवंगाच्या तेलात अॅँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो. पिंपल्स चेहऱ्यावर पसरत देखील नाहीत. चेहऱ्यावरील डाग दूर होतात. लवंगाचा लेप देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
आजकाल टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो. याचे कारण म्हणजे दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी पळून जाईल.
आयुर्वेदात मधुमेहावर लवंग लाभदायी असल्याचे सांगितले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग लाभदायी ठरते.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगाचा फायदा होतो. लवंगाचा नियमित वापर केल्यास या समस्येपासून सुटका मिळेल. रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन लवंग चघळल्यास खोकला दूर होईल आणि तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.