खाता खाता पाणी पिणं योग्य की अयोग्य? तज्ज्ञ काय म्हणतात?

 काही जणांना खाता खाता पाणी पिण्याची सवय असते.  

Updated: Aug 5, 2021, 04:52 PM IST
खाता खाता पाणी पिणं योग्य की अयोग्य? तज्ज्ञ काय म्हणतात? title=

मुंबई : आपल्या आजूबाजुला अनेक जण जेवताना किंवा काहीही खाताना सोबत पाण्याची बॉटल ठेवतात. काही जणांना खाता खाता पाणी पिण्याची सवय असते. खाता खाता पाणी प्यायचं नाही. तसेच जेवणाआधीच्या आणि नंतरच्या  30 मिनिटांनंतरच पाणी प्यायचं, असे सल्ले दिले जातात. या दाव्यांवर अनेक जण आपल्या डॉक्टरांचा सल्ला न घेता अंमल करतात. पण यामागचं नेमक सत्य जाणून घेत नाही. काही रिपोर्टनुसार असंही म्हटलं गेलंय की, जेवणासोबत पाणी प्यायल्याने शरीराचं कोणतही नुकसान होऊ शकत नाही. तसेच एखादी व्यक्ती जेवणासोबत पाणी घेऊ शकते. दरम्यान खाता खाता पाणी प्यायचं की नाही, याबाबत नक्की खरं आणि खोटं काय, त्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो की नाही, हे आपण जाणून घेऊयात. (Know it is right or wrong to drink water while eating)

खाताना पाणी पिणं योग्य की अयोग्य?

जेवण्याच्या 30 मिनिटांआधी आणि 30 मिनिटांनंतर पाणी प्यायचं नाही, असं म्हटलं जातं. जेवणासह पाणी प्यायल्याने तोंडात लाळ तयार होण्याची प्रक्रिया बंद होते. त्याचा परिणाम हो पचनसंस्थेवर होतो. सोबतच न्यूट्रिशन आणि अवशोषण (absorption) यावरही परिणाम होतो. ज्यामुळे खाद्यपदार्थातील पोषक तत्त मिळत नाही, असंही सांगितलं जातं. तसेच खाताना पाणी प्यायल्याने अपचनाच्या त्रासासह वजन वाढीचाही त्रास संभावण्याची शक्यता असते, असंही म्हटलं जातं.

दरम्यान, अनेक रिपोर्ट्समध्ये हे दावे चुकीचे असल्याचं सांगितलं जातं. त्या रिपोर्टनुसार, खाता खाता पाणी प्यायल्याने काहीही त्रास होत नाही. तसेच खाताना पाणी प्यायल्याने शरीराला हाणी पोहचते, असे सांगणारे फार कमी रिपोर्ट्स आहेत. तर इंटरनेटवरही असे अनेक रिपोर्ट्स आहेत. त्यानुसार खाताना पाण्याचं सेवन करु शकतो. 

USA Today च्या एका रिपोर्टमध्येही याबाबतचा फॅक्ट चेक करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलंय की खाण्यासह पाणी प्यायल्याने काहीही बाधा होत नाही. या पोर्टमध्ये अनेक तज्ज्ञांच्या सहमतीनंतर ही बाब निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक मिशेल पिक्को यांनीही म्हटलंय की खाताना पाणी घेतल्याने  पचनक्रियेवर काहीही विपरित परिणाम होत नाही. याचा एकूणच अर्थ असा की खाताना पाणी प्यायल्याने आरोग्याला काहीही तोटा होत नाही.   

टीप : कोणताही प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.