अनेक आजारांना 4 हात लांब ठेवतील ही फळं

फळांचा आहारात समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर

Updated: Aug 5, 2021, 02:17 PM IST
अनेक आजारांना 4 हात लांब ठेवतील ही फळं title=

मुंबई : रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा असं म्हणतात. डॉक्टरही आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करायला सांगतात.आहारात फळांचा समावेश करणं गरजेचं असतं, कारण फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणीअसते. यामुळे रक्ताचं शुद्धीकरण होतं. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचं काम फळातील पाणी करू शकतं.

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणं, बद्धकोष्ठता, आतड्यांच्या समस्या हे विकार जडत नाहीत. आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. सर्दी कमी करण्यास 'क' जीवनसत्व उपयुक्त ठरतंआंबा, कलिंगड, चेरी यामध्ये 'बीटा कॅरॉटीन' नावाचे द्रव्यअसतं. 

आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे आजारांपासून बचाव होऊ शकतो. या फळांचा आहारात समावेश करावा

नारळ

कफ, वात, पित्त याचात्रास असणाऱ्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे वरदान. नारळातील खोबरे आणि नारळपाणी यामध्ये प्रथिने, कार्बोहाड्रेट्सअसतात. आजारपणात डॉक्टरही नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ म्हणजे सर्वप्रकारच्या पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोल आहार असतो.

सफरचंद

सफरचंद संधिवातावर उत्तम असतं. सफरचंद सेवनानेडोकेदुखी आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. सफरचंद शरीराची ताकद आणि रोगप्रतीकारकशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. सफरचंदामुळे शौचाच्या तक्रारी कमी होतात आणिपचनशक्ती सुधारते.

द्राक्षं

द्राक्षांमुळे पित्तदोष कमी होतो. द्राक्षं खाल्यानेथकवा कमी होतो. द्राक्षावर कीटकनाशकांचा प्रभाव अधिक असल्यामुळे द्राक्षं ही दोन -तीन वेळा स्वच्छ धुवून खावीत. 

डाळींब

डाळिंबात ग्लुकोजसारखी चटकन पचणारी साखर असते.डाळिंब दाण्यातील रस रक्तवर्धक असून त्याचा लॅक्टींग एजंट म्हणून म्हणजेच मातेलादूध वाढवण्यासाठी उपयोग होतो. डाळिंब पित्तनाशक असल्यामुळे पित्ताच्या तक्रारीवरउत्तम ठरते. डाळिंबाने वातदोषाचे शमन होते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.डाळिंबाने मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होण्यास मदत होते.

पपई

पपई हे शरीराची ताकद वाढवणारं असून मूळव्याधीवरगुणकारी आहे. मूत्रपिंडाचे विकार कमी करण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो.पपईच्या रसामुळे आम्लपित्त कमी होते शिवाय जठराला आलेली सूज कमी होते. पपईच्यासेवनाने अन्नपचन सुलभ होतं.