Covishieldच्या डोसमधील अंतरावरून Kerala High Courtचा केंद्र सरकारला जाब

केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे.

Updated: Aug 25, 2021, 02:33 PM IST
Covishieldच्या डोसमधील अंतरावरून Kerala High Courtचा केंद्र सरकारला जाब title=

मुंबई : कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यामध्ये 84 दिवसांचे अंतर का आहे, हे स्पष्ट करण्यासाठी केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला प्रश्न विचारला. जर पक्षांनी लस घेतल्या असतील किंवा खरेदी केल्या असतील तर या वेळेतील अंतर कमी करणं शक्य आहे का, असाही प्रश्न यावेळी न्यायालयाकडून विचारण्यात आला आहे.

काइटेक्स ग्रुप ऑफ कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे निरीक्षण केलं ज्यामध्ये म्हटलंय की, सुरुवातीला Covishield चा दुसरा डोस घेण्याची अंतिम मुदत 45 दिवसांची होती. यावेळी न्यायालयाने विचारलं की, वेळेची मध्यांतर वाढवण्यात आली आहे कारण अधिक प्रभावीपणा दिसून आला आहे किंवा लसीच्या सोर्सिंगमध्ये समस्या येत असल्याने तो वाढवला गेला आहे का? न्यायालयाने या मुद्यांवर केंद्राला आपले प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत असल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे कोरोना लस  कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर कमी केले जाऊ शकते. हे अंतर कमी करण्याची सूचना IAPSM म्हणजेच इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेने केली आहे.

या संदर्भात IAPSM चे म्हणणे आहे की केंद्र सरकार या प्रकरणाचा विचार करत आहे. सध्या देशात 59 कोटींपेक्षा जास्त लस डोस  (Vaccine Dose) देण्यात आले आहेत आणि लसीकरणाची प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आता दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांवरून 8 आठवड्यांपर्यंत कमी करण्याचा विचार केला जात आहे. IAPSM ने कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारला सूचवलं आहे.