Health Tips In Marathi: हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. शरीरातील अनेक विषारी घटक निघून जातात. तसंच, पौष्टिक गुणदेखील मिळतात. पावसाळा सुरू झाला आहे. अशावेळी रानभाज्या आवर्जुन खाल्ल्या जातात. रानभाज्या या फक्त पावसाळ्यातच मिळतात. त्या मिळवण्यासाठीदेखील मोठी कसरत करावी लागते. आयुर्वेदातही रानभाज्यांचे महत्त्व आणि त्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. रानभाज्यातील एक महत्त्वाची भाजी म्हणजे कंटोली. कंटोली भाजी देशातील विविध राज्यांत मिळते. वेगवेगळ्या नावांनी ही भाजी ओळखली जाते. या भाजीचे अनेक फायदे शरीराला होतात. जाणून घेऊया या भाजीचे फायदे आणि पाककृती.
कंटोली ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक आजारांवर रामबाण असलेली ही भाजी फक्त पावसाळ्याच्याच दिवसात मिळते. कंटोलीत उच्च मात्रेत फायबर असते जे पाचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. त्यामुळं बद्धकोष्ठतासारख्या समस्यांवर मात करता येते. कंटोलीचे सेवन केल्यामुळं ब्लड शुगरदेखील नियंत्रणात राहते. यातील पौष्टिक गुण शरीरातील साखरेचे स्तर नियंत्रणात ठेवतात. तसंच, कंटोलीतील ग्लायसेमिक इंडेक्सदेखील कमी असते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी जणू औषधचं आहे.
कंटोलीमध्ये कॅलरीची मात्रा खूप कमी असते.ज्यामुळं वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यात चरबीचे प्रमाणही खूप कमी आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ती एक उत्तम भाजी मानली जाते. कंटोलीत व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सर्दी, ताप यासारख्या रोगापासून बचाव होतो. यातील अँटीऑक्सीडेंट शरीरात फ्री रेडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते.
कंटोलीचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. त्यामुळं हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो. या भाजीत पोटॅशियमची मात्रा असते जी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
कंटोलीची भाजी करण्यासाठी सर्वप्रथम भाजी धुवून घ्या. नंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाका. नंतर कंटोळीचे दोन भाग करुन त्याच्या बिया काढून टाका. नंतर नियमित भाजी चिरतो तशी कापून घ्या.
आता कढाईत मोहरी, हिंग, जिरे, हिरव्या मिरची कापून फोडणी द्या. त्यात कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्या. आता त्यात चिरलेली कंटोली टाका. नंतर चवीनुसार मीठ टाकून पुन्हा परतवून घ्या. भाजीला एक चांगली वाफ घ्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)