Hair Fall | हे 5 पदार्थ खाल्ल्याने केसगळतीचं प्रमाण अधिक वाढतं

वाढतं प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडमुळे केसगळती (Hair Fall) होणं सर्वसाधारण बाब झाली आहे. अनेकांना केसगळतीची समस्या भेडसावते.

Updated: Dec 13, 2021, 04:07 PM IST
Hair Fall | हे 5 पदार्थ खाल्ल्याने केसगळतीचं प्रमाण अधिक वाढतं  title=

मुंबई : वाढतं प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडमुळे केसगळती (Hair Fall) होणं सर्वसाधारण बाब झाली आहे. अनेकांना केसगळतीची समस्या भेडसावते. केसगळती रोखण्यसाठी अनेक जण महागडे प्रोडक्ट्स वापरतात. मात्र त्या उत्पादनातून अपेक्षित परिणाम मिळत नाही. या सर्वात आपण एक बाब विसरुन जातो, ती म्हणजे आपल्या आहाराकरडे आपण दुर्लक्ष करतो. केसगळतीमागे अयोग्य आहार हे ही एक मोठं कारण ठरत आहे. (junk food fish Liquor diet soda sweet this foods causes of hair fall)  

काही खाद्य पदार्थांच्या सेवनामुळे केसगळतीची समस्या आणखी वाढीस लागते. ते नक्की कोणते खाद्य पदार्थ आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण अशा 6 खाद्य पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे केसगळतीची समस्या उद्भवते.

गोड पदार्थ 

गोड पदार्थाचं सेवन करणं हो आरोग्यासगह केसगळतीसाठीही हानिकारण आहे. अनेक रिपोर्टनुसार, अधिक गोड खालल्याने मधुमेह, लठ्ठपणा यासारखे आजार संभवतात. 

या कारणामुळे महिला आणि पुरुषांना केसगळची सामना करावा लागतो. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात साखरेचं सेवन करत असाल, तर तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. 

डाएट सोडा 

डाएट करणाऱ्यांचा कळ हा डाएट फ्रेंडली खाद्यपदार्थांकडे असतो. अनेक जण डाएट सोड्याचं सेवन करतात. मात्र डाएट सोड्याच्या अतिसेवनाने तुमचे केस गळू शकतात. शीतपेयातील गोडवा वाढवण्यासाठी डाएट सोड्यात Aspartame हा पदार्थ मिळवला जातो. 

अंड्यातील पाढंरा भाग 

केसाच्या आरोग्यासाठी अंड्यांचं सेवन लाभदायक असल्याचं म्हंटलं जातं. मात्र कच्ची अंडी खालल्याने शरिरात बायोटिनची कमतरता जाणवते. बायोटिन हा केस तयार होण्यासाठी फायदेशीर ठरतो. 

जंक फूड 

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय. या जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणात बॅड फॅट असतं. जे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी हानीकारण असतं. याचा परिणाम हा केसाच्या आरोग्यावरही होतो. अधिक तेलकट पदार्थ खाल्ल्याने डोक्याची त्वचा ही तेलकट होते.

मद्य

केराटिन प्रोटीनपासून आपले केस तयार होतात. मद्य सेवनामुळे केराटिन प्रोटीनवर वाईट परिणाम होतं.  यामुळे केस कमजोर होतात तसाच तुटतातही. अधिक मद्य सेवनामुळे शरीरातील पोषक तत्वही कमी होतात.त्यामुळे केसगळतीची समस्या आणखी वाढीस लागते.  

मासे

गेल्या काही वर्षांपासून वातावरणीय बदलांमुळे माशांमधील पाऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. माशांच्या माध्यामतून हा पारा आपल्या शरीरात जातो. शरीरात पाऱ्याचं प्रमाण अधिक झाल्यास केसगळतीची समस्या सुरु होते. त्यामुळे अधिक मासे खाऊ नयेत.