आयुर्वेदात हळद आणि गुळ हे अतिशय गुणकारी मानले जाणारे पदार्थ आहे. हे दोन्ही पदार्थ आपल्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात. गुळ हा साखरेला सर्वोत्तम पर्याय असल्याच म्हटलं जातं तर हळदीमध्ये मुख्य तत्व हे करक्युमिन असते. तसेच हळदीमधील अँटीऑक्सीडेंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणांनी भरपूर असते. गुळामध्ये आर्यन, पोटॅशियम आणि इतर मिनरल असतात. पण गुळ आणि हळद हे दोन्ही पदार्थ एकत्र चाटण म्हणून खाल्ल्यास 7 आजारांवर गुणकारी फायदा होतो. शरीरात साचलेली घाण देखील यामधून निघून जाते.
रोग प्रतिकारशक्ती सुधारते
हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुण असतात. यामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती सुधारते. हळदीमध्ये गुळ मिसळून खाल्ल्याने शरीरात होणाऱ्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. थंडी, खोकला आणि सर्दीपासून बचाव करणे फायदेशीर असते.
पचनक्रिया सुधारते
गुळ खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पचनक्रिया यावेळी उत्तेजित होते आणि हळद पोटाची सूज कमी करण्यास मदत करते. तसेच गॅसच्या समस्यांपासूनही आराम मिळते. या समस्या जाणवत असतील तर हळद-गुळाचे चाटण खावे.
रक्त स्वच्छ होते
दररोज गुळ खाल्ल्यावर रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास फायदा होतो. हळद रक्ताला पातळ ठेवण्यास मदत करते. रक्ताच्या गुढळ्या होण्यापासून बचाव केला जातो. यामुळे कायम हळद आणि गुळ एकत्र खाणे फायदेशीर ठरते.
सूज आणि दुखणे होते कमी
हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म वेदना कमी करण्यासाठी प्रभावी बनवतात. हळद आणि गुळाच्या सेवनाने शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज किंवा सांधेदुखी कमी होण्यास आराम मिळतो. सांधेदुखीच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते.
मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम
गूळ आणि हळदीचे सेवन स्त्रियांच्या मासिक पाळीच्या दरम्यान वेदना आणि अनियमिततेवर उपयुक्त ठरू शकते. गूळ हा लोहाचा चांगला स्रोत आहे, जो अशक्तपणावर मात करण्यास मदत करतो. हळद रक्त प्रवाह सामान्य करण्यासाठी उपयुक्त आहे.
सर्दी आणि खोकल्यापासून आराम
गूळ आणि हळद यांचे कोमट मिश्रण सर्दी-खोकल्यामध्ये घशाला आराम देते. हे श्लेष्मा बाहेर टाकण्यास मदत करते आणि घसा खवखवणे देखील कमी करते.
त्वचेसाठी फायदेशीर
हळदीतील अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला चमक आणतात आणि संक्रमणांपासून संरक्षण करतात. गुळामुळे त्वचेला पोषणही मिळते आणि मुरुमांची समस्या दूर करण्यात मदत होते. या दोघांचे मिश्रण त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
कसा वापर कराल?
तुम्ही गूळ आणि हळद पाण्यात मिसळून किंवा थेट खाऊ शकता.
तुम्ही ते दुधात मिसळूनही पिऊ शकता. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही अनेक आरोग्य समस्या टाळू शकता.
हळद आणि गूळ यांचे चाटण हा एक नैसर्गिक आणि सोपा उपाय आहे जो अनेक आरोग्यदायी फायदे देतो.
याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण पचनक्रिया, रक्त शुद्धीकरण आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते.