सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार शेखर रावजियानी याला तर सगळेच ओळखतात. शेखरने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. शेखर आणि विशाल ददलानी या जोडीने इंडस्ट्रीला अनेक हिट गाणीही दिली आहेत,पण शेखरच्या नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांनाच धक्का बसला.
मी माझा आवाज 2 वर्षांपूर्वी गमावला
बॉलिवूड गायक शेखरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानी लिहिले की, ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल मी यापूर्वी कधीचं बोललो नाही. आज मला ते शेअर करावेसे वाटते. मी दोन वर्षांपूर्वी माझा आवाज गमावला होता. मला वाटलं आता मला गाता येणार नाही. यानंतर मी सॅन डिअॅगो, कॅलिफोर्नियाला गेलो. मला तिकडे डॉ. एरिन वॉल्श बद्दल समजले. त्यांच्या मदतीने मी माझा आवाज परत मिळवू शकलो.
शेखरने पुढे लिहिले की, माझे कुटुंब काळजीत होते. त्यांना तणावात पाहून मलाही वाईट वाटत होते. मला वाटले की, मी कधीच गाऊ शकणार नाही. पण मी कधीच हार मानली नाही. मी देवाला प्रार्थना केली आणि काम करणे थांबवले नाही. प्रयत्न करत राहिलो, पुढे जात राहिलो.या दरम्यान मला काही आठवड्यांसाठी सॅन डिअॅगोला जावे लागले. मी जेरेमीला सॅन डिअॅगोमध्ये भेटलो. तिने माझी डॉ. एरिन वॉल्शशी ओळख करून दिली.
डॉ. एरिन वॉल्श ज्यांना मी कोविडमुळे भेटू शकलो नाही. पण आम्ही झूम कॉलवर बोललो. मला आठवतं की मला पुन्हा गाण्याची इच्छा आहे हे सांगताना माझ्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. मी त्यांना विनंती केली की कृपया काहीही करा. तिने मला सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे माझा आवाज गमावल्याबद्दल मी स्वतःला दोष देऊ नये. आम्ही बराच वेळ बोललो आणि शेवटी अचानक त्यांनी मला खात्री दिली की मी गाऊ शकतो. हे माझ्यासाठी पहिले पाऊल होते.
मला माझ्याचं आवाजाचा तिरस्कार वाटू लागला होता.
शेखरने पुढे लिहिले की, पण प्रत्येक वेळी मी रडत असताना कर्कश आवाजात बोलायचो आणि मलाच माझ्या आवाजाचा तिरस्कार वाटू लागला, पण, डॉ. एरिन वॉल्श यापासून मागे हटल्या नाही आणि मला बरे करण्याचा आणि माझा आवाज परत मिळवण्याचा प्रयत्न केला. मी आता पूर्णपणे ठीक आहे. आणि मी पूर्वीपेक्षा चांगले गाऊ शकतो. डॉ. एरिन वॉल्श, पृथ्वीवरील माझा देवदूत आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तेव्हापासून, मी अशा अनेक लोकांना भेटलो आहे ज्यांनी कोविड नंतर त्यांचा आवाज गमावला आहे फक्त सकारात्मक राहा आणि विश्वास ठेवा. तुमच्या हृदयात नेहमी आशा ठेवा. तुम्हाला शोधण्यासाठी आणि तुम्हाला बरे करण्यासाठी तेथे नेहमी देवदूत असतील. जय हनुमान
शेखर रावजियानी यानी अनेक प्रसिद्ध गाणी या चित्रपटसृष्टीसाठी दिलेत. शेखरनं आवाज ठिक झाल्यानंतर झुमे जो पठान , जेहेनसिब, राधा, इश्क जैसा कुछ यांसारखी लोकप्रिय गाणी गायली.