Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. तो दोघं एकत्र राहत नाहीत इथ पासून ते ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये सतत मतभेद होत असतात इथपर्यंतच्या बातम्या. हे इथेचं थांबलं नाही तर त्यासोबत अभिषेकच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. या सगळ्या चर्चांमध्ये आता अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांनी त्यावरून त्याला प्रश्न विचारला आहे की नेमकं त्याला काय झालं आहे.
अभिषेक बच्चननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिषेक बच्चन हा रुग्णालयात असल्याचं दिसून येत आहे. यावेळी तो व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं वाटत आहे. तर यावेळी अभिषेक बोलतोय की मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा तुझ्या तोंडात काही असतं आणि तू ते खात असते त्याचवेळी तू माझ्याशी फोनवर बोलते ते ऐकायला खूप घाण वाटतं. त्यानंतर अभिषेक खाऊन दाखवण्याचा अभिनय करुन दाखवताना दिसतोय.
अभिषेकला काही झालेलं नाही तर हा त्याचा आगामी चित्रपट आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटातील एक छोटी क्लिप आहे. तो सध्या सतत सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतोय. त्यानं शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकरी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'अभिषेक एकमेव असा अभिनेता आहे ज्याला सिनेमा आणि अभिनय काय आहे ते कळतं. किती टॅलेन्टेड आणि उत्तम अभिनेता आहेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मी तर हे खरंमध्ये काही झालं असं समजत होतो पण आता कळलं हा तर अभिनय करतोय. चित्रपटाचं प्रमोशन करतोय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'खूप सुंदर अभिनय केला आहेस.' यात सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. करीना कपूर म्हणाली, 'एबी मला तुझे हे सगळे प्रोमो खूप आवडतायत... तू खूप छान अभिनय करतोयस, तुझ्यासाठी मी आनंदी आहे.' याशिवाय अनेक सेलिब्रिटींनी हार्ट इमोटिकॉन शेअर करत कमेंट केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत सुरुवातीला आम्हाला भीती वाटली असं सांगितलं.
हेही वाचा : श्रीदेवी-माधुरी नाही तर 'या' अभिनेत्रीच्या चित्रपटानं कमावले होते 1 हजार कोटी
दरम्यान, त्याचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केलं आहे. या चित्रपटातून अभिषेक पहिल्यांदा अशा भूमिकेत दिसणार आहे ज्यात त्याला कधी कोणी पाहिले नाही.