कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 26, 2024, 12:55 PM IST
कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट  title=

Indian spices to treat cancer News In Marathi : कॅन्सर अर्थातच कर्करोग हा एक भयंकर आजार आहे. ज्यामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. कॅन्सरबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कॅन्सर हा गंभीर आजार आहे, परंतु प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे रुग्णांना निश्चितच आराम मिळू शकतो. केवळ कॅन्सरवरील उपचार महाग असल्याने सर्व रुग्णांना ते परवडणारे नसतात. साधारणपणे 200 प्रकार कॅन्सरचे आहेत. मात्र याच आजारावर एक रामबाण उपाय आला आहे. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने भारतीय मसाल्यांवर संशोधन पेटंट मंजूर केले आहे. भारतीय मसाल्यांद्वारे कॅन्सरवर उपचार करणारी औषधे तयार करू शकतात असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. या आजाराशी संबंधित वैद्यकीय चाचण्या लवकरच सुरू होतील. हे औषध 2028 पर्यंतच बाजारात उपलब्ध होऊ शकते, अशी माहीती देण्यात आली आहे. 

भारतीय मसाले  लंग कॅन्सर सेल, ब्रेट कॅन्सर सेल, कोलन कॅन्सर सेल, सर्वायकल कॅन्सर सेल, ओरल कॅन्सर सेल आणि थायरॉइड कॅन्सर सेलमध्ये अँटी कॅन्सर अॅक्टिव्हिटी दाखवितात. या मसाल्यांमुळे शरीरातील सामान्य पेशींना कोणतेही नुकसान होणार नसल्याचा दावा यामधून करण्यात आला आहे. संशोधन सध्याया यासाठी येणारा खर्च आणि सुरक्षिततेच्या समस्यांवर काम करत आहेत. यासंबंधी प्राण्यांचा अध्ययन करण्यात आले आहे. आयआयटी मद्रास माजी विद्यार्थी आणि प्रतीक्षा ट्रस्टकडून इन्फोसिसचे सह-संस्थापक गोपालकृष्णन यांच्याकडून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे हे शक्य झाले आहे. 

मसाल्यांमुळे जेवणाची चव वाढते पण असे अनेक मसाले आहेत जे कॅन्सरसारख्या आजारांवर रामबाण उपाय ठरणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास येथील संशोधकांनी भारतीय मसाल्यांच्या वापरासाठी पेटंट मिळवले आहे. हे पेटंट कॅन्सरसारख्या घातक आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. मसाल्यांचा वापर करून बनवलेली औषधी गुणधर्म असलेली औषधे 2028 पर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

भारताती कॅन्सर बाधित रुग्णांची संख्या

जगात सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या रोगांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर, कॅन्सर दुसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार 2020 मध्ये कॅन्सरमुळे 1 कोटी लोकांनी आपला जीव गमावा लागला आहे. म्हणजेच जगातील प्रत्येक सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू कॅन्सरमुळे झाला. भारतात 2020 मध्ये 7 लाख 70 हजार लोकांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे तर 2021 मध्ये हा आकडा 7 लाख 79 हजार आणि 2022 मध्ये 8 लाख 8 हजारांवर पोहोचला आहे.