Top Benefits Of Dry Fruit : ड्रायफ्रूट्स खाल्यास तुम्हाला 'असे' होतील फायदे....

आज आपण इथे 5 ड्रायफ्रूट्स विषयी सांगणार आहोत... जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स खाल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो...

Updated: Sep 18, 2022, 04:48 PM IST
Top Benefits Of Dry Fruit : ड्रायफ्रूट्स खाल्यास तुम्हाला 'असे' होतील फायदे.... title=
If you eat dry fruits you will get such benefits

Top Benefits Of Dry Fruit :  तुम्हाला माहितच असेल की ड्रायफ्रूट्स (Dry Fruit) आरोग्यासाठी किती फायदेशीर (Benefits) आहेत... वृद्ध असो किंवा लहान मुलांना डॉक्टर देखील ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला सगळ्यांना देतात. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ड्रायफ्रूट्स खाऊन करत असाल तर तुमच्या शरीराला पोषण तत्वे मिळतात. रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्यास त्याचा आणखी फायदा होतो. (If you eat dry fruits you will get such benefits)

आज आपण इथे 5 ड्रायफ्रूट्स विषयी सांगणार आहोत... जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स खाल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो...

1. काजू (Cashews)
काजू जगप्रसिद्ध ड्रायफ्रूट्स पैकी आहे. त्याचे फायदे ही तसेच आहेत. कॅल्शिअम, स्निग्ध पदार्थ, खनिजे, फॉस्फरस, कर्बोदके आणि प्रोटीन्सचा उत्तम स्रोत म्हणून काजुला ओळखले जाते. बोंडूमध्ये (काजु फळ) फायबर विपुल प्रमाणात असते. बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते. काजू हृदयरोग आणि मधुमेह टाळण्यासाठी मदत करते. काजू नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काजू हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. काजूच्या प्रति 100 ग्रॅमला 590 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते.

2. बदाम (Almonds)
बदामाला ड्रायफ्रूटचा राजा म्हटले जाते. लहान मुले, प्रौढ आणि वयस्करही आपल्या क्षमता आणि कॅपेसिटीनुसार बदामाचे सेवन करतात. बदामापासून दूध (Milk),तेल (Oil), लोणी (Butter), पीठ (Flour) इत्यादी बनवले जाते. बदाम दररोज खाल्यास आपल्याला बरेचसे फायदे होतात. बदाम खाल्याने ब्लड शुगरला नियंत्रित करते, मेंदूला निरोगी ठेवते, वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. तसेच हृदयाला निरोगी बनवते आणि व्हिटॅमिन - ई चा जास्त फायदा होतो.  

आणखी वाचा... उत्साह कमी करणाऱ्या या 5 सवयी तुमच्यात आहेत का? जाणून घ्या...

3. पिस्ता (Pistachios)
पिस्ता स्वादिष्ट असतो त्यामुळे सगळ्यांचा आवडतो. पिस्त्यात तितकीच पोषकतत्वे असतात. पिसत्याचे खुप चांगले फायदे देखील आहेत. पिस्ता दररोज खाल्याने उपयुक्त अँटी-ऑक्सिडंटस मिळतात, ह्रद्यविकाराचा धोका कमी होतो, ब्लडप्रेशर नियंत्रित राहते, वाईट कोलेस्टोरॉल कमी होते, डायबेटीसदेखील आटोक्यात राहण्या मदत करतो. 

4. अक्रोड (Walnuts)
अक्रोड आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. अक्रोडात खुप औषधी गुण असतात. अक्रोड खाल्याने स्मरणशक्ती वाढते. अक्रोड खाण्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. वजन कमी करायचे असल्यास अक्रोड खाणे एक चांगला पर्याय आहे. अक्रोड खल्याने कोलेस्टोरॉल आटोक्यात राहतो.

5. पेकान्स (Pecans)
विदेशी फळाचे पेकन फायदे आणि हानी त्याच्या घटक घटकांमुळे आहेत. या वनस्पतीच्या संरचनेत जीवनसत्त्वे आणि शोध काढूण घटकांचे लक्षणीय कॉम्प्लेक्स आहे. पेकन हे फॅटी ऍसिडचे स्त्रोत आहेत जे मानवी शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक आहे. तसेच हिमोग्लोबिन पातळी वाढणे, थकवा काढून टाकणे, शक्ती आणि ऊर्जा भरणे, वाढलेली भूक (जर तुम्ही जेवणापूर्वी दोन काजू खाल्ल्यास), रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले, त्वचा, नखे आणि केसांची स्थिती सुधारते. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)

आणखी वाचा... Weight Loss Tips: चपाती की ब्रेड? वजन कमी करण्यासाठी काय ठरू शकतं फायदेशीर