Honey Singh On Shah Rukh Khan: रॅपर हनी सिंगच्या जीवनावर आधारित 'यो यो हनी सिंग : फेमस' डॉक्यूमेंट्री फिल्म रिलीज झाली आहे. यामध्ये हनी सिंगने शाहरुख खानच्या त्या अफवांवरचा खुलासा केला आहे. ज्यात शाहरुख खानने अमेरिकेतील शोदरम्यान हनी सिंगला कानशिलात लगावल्याचे सांगण्यात आले होते. असं देखील म्हटले जात आहे की, शाहरुख खानने हनी सिंगला जोरात मारले होते. त्यामुळे रॅपरला टाके पडले होते. दरम्यान, डॉक्यूमेंट्री फिल्ममध्ये, रॅपरने ही अफवा फेटाळून लावली असून प्रत्यक्षात काय घडले होते याबद्दल सांगितले आहे.
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार रॅपर हनी सिंगने नेमकं त्या दिवशी काय घडलं याबाबत खुलासा केला आहे. यावेळी या घटनेबाबत कोणालाच माहिती नसल्याचे हनी सिंगने सांगितले. हनी सिंग अमेरिकन दौऱ्यात परफॉर्म करण्यास तयार नव्हता. तरी देखील त्याच्या टीममधील सदस्य त्याला स्टेजवर जाण्यासाठी आग्रह करत होते. या दरम्यान, त्याला खूप राग आला आणि त्याने त्याच्या डोक्यात मारून घेतले. त्यामुळे तो जखमी झाला.
9 वर्षांनंतर हनी सिंगचा मोठा खुलासा
हनी सिंग म्हणाला की, शाहरुख खानने मला कानशिलात लगावल्याची ही अफवा कोणी पसरवली मला माहिती नाही. शाहरुख खान माझ्यावर खूप प्रेम करतो. तो माझ्यावर कधीच हात उचलणार नाही. त्यावेळी मला शोसाठी शिकागोला घेऊन गेले. मला शो करायचा नव्हता. परंतु टीममधील काही सदस्य मला आग्रह करत होते. पण मी शो करण्यास नकार दिला होता. त्यावेळी हनी सिंगने वॉशरुममध्ये जाऊन केस ट्रिम केले. त्यानंतर देखील मला टोपी घालून परफॉर्म करण्यास सांगितले. त्यावेळी मी तिथे असणारा कॉफीचा मग घेतला आणि डोक्यावर मारला.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालीये ही डॉक्यूमेंट्री
'यो यो हनी सिंग: फेमस' चे दिग्दर्शन मोजेज सिंग यांनी केलं आहे. यामध्ये हनी सिंगच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल कधीही न पाहिलेले क्षण दाखवण्यात आले आहेत. ही डॉक्यूमेंट्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.