5 Habits That Drain Your Energy : काही सवयी माणसासाठी फायदेशीर (Beneficial) असतात, तशा काही घातक म्हणजेच अपायकारक ही असतात. जसे की भरपूर राग येणे, दारू पिणे (drink alcohol), सिगरेट ओढणे (smoking cigarettes), इतरांना मनाला लागतील असे टोमणे मारणे, असे सर्व. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाईट सवयींवर मात करून चांगल्या सवयी अंगी बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. ज्याने तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी पोहोचण्याचा मार्ग जास्त सुकर होतो. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायला जाल आणि तेच काम संपवण्यासाठी सुद्धा उत्साह शिल्लक राहत नाही…. (Do you have these five habits that demotivate you Find out)
1. अतिविचार (overthinking)
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. 'कोणतीही गोष्ट करताना विचार करा' असे आपण लहानपणापासूनच घरातील वडिलधाऱ्यांकडून शिकत असतो. पण इतका ही विचार करु नका की ते काम करताना आपल्याला ताण येईल. आणि ते काम पुर्ण होणार नाही. आणि यालाच अतिविचार करणे म्हणतात. अनेकदा आपल्या अतिविचारामुळेचं आपण स्वत: वर संकटे ओढावून घेत असतो.
2. विसंगत झोप (inconsistent sleep)
प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळ तर सुरूचं असते. या धावपळीत आपली पुरेशी झोप होत नाही. झोप अपूर्ण असेल तर साहजिकच आपली चिडचिड होते. रात्रीची झोपही 8 तास पुर्णचं झाली पाहिजे. जर आपली झोप पुर्ण असले तर त्याचा परिणाम आपल्या कामात पण दिसून येतो. विसंगत झोप ही आजाराला निमंत्रण देणारी असते.
आणखी वाचा... What Girls Notice In Boys: मुली मुलांमध्ये नेमकं काय पाहतात; आताच जाणून घ्या...
3. नकारात्मक विचार घेऊन फिरणे (hanging around with negative people)
आपण आयुष्यात अनेकदा सकारात्मक (Postive) पेक्षा नकारात्मक (Negative) विचार जास्त प्रमाणात करत असतो. जर आपण नकारात्मक असू तर आपल्या जवळ नकारात्मक उर्जा (Negative Vibes) पाहायला मिळते. त्यामुळे आपण अशा नकारत्मक विचारांना महत्त्व कमी दिल्यास किंवा त्याच्यापासून लांब राहिल्यास याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल.
4. चीड / नाराजी धरून ठेवणे (holding onto/resentment)
बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाही तर आपल्याला राग येतो आणि आपली चिडचिड होते. तर काहीवेळेस आपण आपला राग समोरच्या व्यक्तीजवळ व्यक्त होत नाही तोपर्यंत आपला राग शांत होत नाही. परिणामी हळुहळु चिडचिड होण्यास सुरु होते. जर राग तुम्ही मनात धरुन ठेवला तर कदाचित तुमची कामे होणार नाहीत. आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून नेहमीच तक्रार (Complaint) ऐकायला मिळेल.
5. चुकीच्या आहाराच्या सवयी आणि पुरेसे पाणी न पिणे (poor diet habits and not drinking enough water)
आपल्या आहारावर सगळ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपला आहार संतुलित (Balanced Diet) असला पाहिजे. आहाराच्या वेळा ठरलेल्या असल्या पहिजेत. बऱ्याचदा आहारात समतोल नसल्यामुळे आपल्या (Energy) वर त्याचा फायदा होत असतो. 3-4 लीटर पाणी (Water) दिवसाला पिणे गरजेचे आहे. आपण पाणी कमी पित असल्यास त्याचा देखील फरक आपल्या (Energy) वर जाणवतो.
जर तुमच्या बाबतीत ही असे होत असेल तर तुम्ही या सवयी (Habits) बदलून पाहाव्यात. तुमच्यामध्ये उत्साह नक्कीचं येईल.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)
आणखी वाचा... Cholesterol कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर? काय आहे सत्य?