#humfittohindiafit - ऋतिक रोशनने स्वीकारलं फीटनेस चॅलेन्ज, चाहत्यांंना दिला 'हा' सल्ला

राज्यवर्धन सिंह राठोर यांनी काही दिवसांपूर्वी  #humfittohindiafit हे खास फीटनेस चॅलेन्ज सुरू केले आहे.

Updated: May 25, 2018, 11:12 PM IST
#humfittohindiafit - ऋतिक रोशनने स्वीकारलं फीटनेस चॅलेन्ज, चाहत्यांंना दिला 'हा' सल्ला  title=

 मुंबई : राज्यवर्धन सिंह राठोर यांनी काही दिवसांपूर्वी  #humfittohindiafit हे खास फीटनेस चॅलेन्ज सुरू केले आहे.या चॅलेन्जच्या अंतर्गत सध्या सोशलमीडियावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे फीटनेस फंडे शेअर केले आहेत. यामध्ये  विराट कोहली, सायना नेहवालपासून अनेक राजकारणांचा समावेश आहे. 

ऋतिक रोशनचा खास फंडा  

पिळदार शरीरयष्टी आणि सिक्स पॅक अ‍ॅब्सने ऋतिक रोशनने अनेकदा स्क्रिनवर तरूणाईला वेड लावलं आहे. मात्र ऋतिक रोशनने फीटनेस चॅलेन्जमध्ये कारऐवजी सायकलने जाण्याचा सल्ला दिला आहे. गाडीत बसून काहीच कॅलरीज बर्न होत नाहीत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सायकलवरून जाण्याचा सल्ला त्याने दिला आहे. 

दोघांना दिले चॅलेन्ज 

ऋतिक रोशनने त्याचं फीटनेस चॅलेन्ज कुणाल कपूर आणि टायगर श्रॉफला दिलं आहे. लवकरच ऋतिक रोशन ' सुपर 30 ' या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.  या सिनेमामध्ये ऋतिक  शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे.