Healthy Drink: सर्दी-खोकल्यातून सुटका हवी आहे?, घशातील कफ तात्काळ वितळण्याठी घरगुती सोपा उपाय

Health Tips: सर्दी-खोकल्यातू सुटका हवेय आणि घशातील कफ तात्काळ वितळण्यााठी घरगुती सोपा उपाय करुन बघा. लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते.

Updated: Dec 28, 2022, 01:21 PM IST
Healthy Drink: सर्दी-खोकल्यातून सुटका हवी आहे?, घशातील कफ तात्काळ वितळण्याठी घरगुती सोपा उपाय title=

How to make clove tea: सध्या थंडी सुरु झाली आहे. थंड वातावरणात सर्दी, कफ याची समस्या जाणवत असते. घशात साठलेला कफ वितळविण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्यासाठी लवंग चहा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. लवंगाच्या चहाचे सेवन केल्याने सर्दी-खोकला, घसा खवखवणे आणि नाक बंद होण्यासारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.

लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते. जेवणाची चव वाढवण्यासाठी लोक लवंग वापरतात. याशिवाय लवंगात अँटीसेप्टिक, अँटीवायरल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म देखील असतात, जे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देतात.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी लवंगी चहा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. लवंगाच्या चहाचे सेवन केल्याने सर्दी-खोकला, घसा खवखवणे आणि नाक बंद होण्यासारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो. याशिवाय पोटदुखी, फुगणे आणि मळमळ यासारख्या समस्यांवरही लवंग उपयुक्त ठरत आहे.

 लवंगाचा चहा बनवण्याची पद्धत जाणून घ्या. लवंग चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य.  

3 लवंगा

1 कप पाणी

लवंग चहा कसा बनवायचा? (How to make clove tea)

लवंग चहा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक कप पाणी घाला.

मग त्यात लवंगा टाकून नीट उकळा.

यानंतर, किमान 3-5 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा. 

नंतर तयार चहा एका कपमध्ये गाळून घ्या. 

आपण आपल्या चवीनुसार मध देखील घालू शकता. 

आता तुमचा गरमागरम लवंगी चहा तयार आहे.

लवंगचे आणखी काही फायदे

लवंग दिसायला अगदी छोटीशी असली तरी त्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत. अनेक आजार आहेत ज्यावर औषध म्हणून आयुर्वेदात घरगुती पदार्थ मग त्यात मसाले असो किंवा इतर अन्नपदार्थ यांचा रामबाण उपाय म्हणून वापर सांगण्यात आला आहे. सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज 3-4 चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्‍शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल.

 शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते.

लवंगाच्या तेलात अ‍ॅँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो.  लवंगाचा लेप देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. तसेच आजकाल टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो. याचे कारण म्हणजे दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी कमी होते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)