Toothbrush in Bathroom: निरोगी आरोग्यासाठी ओरल हेल्थची काळजी घेणेही गरजेचे असते. दातांची निगा राखण्यासाठी टुथपेस्टपासून ते ब्रशदेखील योग्य असावा लागतो. अनेकदा घरात जागा कमी असल्यामुळं कॉमन बाथरुम वापरण्यात येते. त्याच बाथरुममध्ये टुथब्रश होल्डर ठेवण्यात येते. यातच कुटुंबातील सगळ्या व्यक्तीचे टुथब्रश आणि पेस्ट ठेवण्यात येते. पण कॉमन बाथरुममध्ये टुथब्रश ठेवणे गरजं आरोग्यासाठी चांगलं असतं का? याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. बाथरुममध्ये टुथपेस्ट ठेवणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे आज जाणून घेऊया.
दंतवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये फ्लश केल्यानंतरही बाथरुममध्ये विष्ठेचे काही जंतु अस्तित्वात असतात. त्यामुळं टॉयलेटचे झाकण न लावता जेव्हा फ्लश करतात तेव्हा पाण्याचे काही थेंब बाहेर येऊ शकतात. त्याबरोबरच जंतुही बाथरुमच्या फरशीवर येऊ शकतात. पाणी सुकल्यानंतर हे जंतु तुमच्या टुथब्रशसह अन्य जागांवर बसू शकतात. अशातच जेव्हा तुम्ही ब्रश न धुता त्यावर त्याचा वापर करतात तेव्हा ते जंतु तुमच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शक्य झाल्यास बाथरुममध्ये टुथब्रश ठेवणे चुकीचे ठरु शकते. त्यामुळं बॅक्टेरियामुळं तुमचा ब्रश खराब होऊ शकतो. इतकंच नव्हे तर, ज्या घरांमध्ये एकच बाथरुम अनेकजण वापरत असतील तिथे क्रॉस- कंटेमिनेशन होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं घरातील इतर लोकांचे टुथब्रश एकत्र न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.
डेंटल एक्स्पर्टनुसार, ब्रश वापरण्याआधी तु पाण्याने स्वच्छ धुवावा. असं केल्याने ब्रशवर जमा झालेले बॅक्टेरिया निघून जातात. तसंच, ब्रश केल्यानंतर त्यावरील कव्हर लावायला विसरू नका. आजकाल सर्वच ब्रशसोबत कव्हर देखील दिले जाते. एकदा नवीन ब्रश वापरायला काढायला नंतर जास्तीत जास्त ३ महिनेच वापरावा. टूथब्रशचे ब्रिसल दात चांगल्याने स्वच्छ करण्यास मदत करतात पण एकच टूथब्रश दिर्घकाळ वापरत असाल तर ब्रिसल खराब होतात. त्यामुळं दातांची नीट स्वच्छता होत नाही. त्यामुळं हिरड्या कमजोर होऊ शकतात. एक टूथब्रश दिर्घकाळ वापरल्याने त्यावर बॅक्टेरीया, व्हायरल आणि फंगसचा थर जमा होतो ज्यामुळे दातांसह तोंडात इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एक एक टूथब्रश दिर्घकाळ कधीच वापरू नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)