6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव किती राहतो?; नव्या रिसर्चमध्ये खुलासा

कोरोना लसीसंदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. 

Updated: Aug 26, 2021, 12:44 PM IST
6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव किती राहतो?; नव्या रिसर्चमध्ये खुलासा title=

मुंबई : कोरोना लसीसंदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. हे संशोधन चिंतेत टाकणारं आहे. या संशोधनानुसार, केवळ 6 महिन्यांनंतर कोरोना लसीचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो. संशोधनात यावर भर देण्यात आला आहे की, कोविड लसीच्या दोन डोसनंतर, बूस्टर डोस देखील घ्यावा. ब्रिटनमध्ये हे संशोधन फायजर/ बायोनटेक आणि ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका या लसींवर केलं गेलं.

मिळालेल्या माहितीनुसार, फायझर लस कोरोनावर मात करण्यासाठी 88 टक्के प्रभावी आहे. परंतु या लसीचे दोन्ही डोस झाल्यावर पाच ते सहा महिन्यांनंतर त्याचा परिणाम 88 टक्क्यांवरून 74 टक्क्यांवर येत असल्याचं समोर आलंय. यूकेच्या ZOE COVID संशोधनात ही माहिती आढळून आली आहे. त्याचप्रमाणे, अॅस्ट्राझेनेकाची कोरोना लस 77 टक्के प्रभावी आहे. त्याचा प्रभाव 4 ते 5 महिन्यांनंतर 67 टक्क्यांपर्यंत राहतो.

येत्या काही महिन्यांत हा प्रभाव आणखी कमी होऊ शकतो.

ZOE Ltdचे सह-संस्थापक टीम स्पेक्टर यांनी म्हटलंय, आहे की येत्या हिवाळ्यात संरक्षण 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. हे घडण्याची शक्यता वृद्ध व्यक्ती आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमध्ये अधिक आहे. 

ब्रिटन आणि अनेक युरोपियन देश कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये कोविड लसीचा तिसरा डोस दिला जाऊ शकतो. अमेरिकेत यावर विचार करत आहे.