या ३ घरगुती उपायांनी दूर करा झोपत लाळ गळण्याची समस्या!

झोपत लाळ गळ्याची समस्या तुम्हीही त्रस्त आहात का?

Updated: May 18, 2018, 11:42 AM IST
या ३ घरगुती उपायांनी दूर करा झोपत लाळ गळण्याची समस्या! title=

मुंबई : जागे असण्याच्या तुलनेत झोपेत अधिक लाळ निर्माण होते. झोपेत आपण तोंडाने श्वास घेत असतो आणि त्यामुळेच झोपेत लाळ गळते. तर काही वेळेस खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून एलर्जी होते किंवा काही औषधांमुळे अधिक लाळ निर्माण होते. झोपत लाळ गळ्याची समस्या तुम्हालाही असेल तर हे घरगुती उपाय त्यावर कामी येतील.

 

  • तोंडातून लाळ गळत असल्यास पचनास खूप वेळ लागणारे अन्नपदार्थ खाण्यापासून दूर रहा. पोट साफ ठेवा. त्याचबरोबर लाळ गळण्याची समस्या असल्यास तुळशीची पाने चावा आणि थोडे पाणी प्या. दोन-तीन वेळा असे केल्याने लाळेपासून सुटका मिळेल. 
  • रात्री झोपेत लाळ गळल्याने काहीसे लाजल्यासारखे वाटते तर मग फटकीच्या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे लाळ गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
  • लाळ गळण्याच्या समस्येवर आवळा पावडर फायदेशीर ठरते. त्यासाठी जेवल्यानंतर लगेचच कोमट पाण्यात आवळा पावडर घालून प्यायल्याने नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर अॅसिडीटीपासूनही सुटका मिळेल.