फूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय!

बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 24, 2018, 01:49 PM IST
फूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय! title=

नवी दिल्ली : बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते. पण काही वेळा अनहेल्दी, अस्वच्छ पदार्थ पोटात गेल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवते. अशावेळी काही घरगुती उपाय जे अत्यंत फायदेशीर ठरतात... या जाणून घेऊया...

आलं

आलं हे अन्नपचनासाठी अतिशय फायदेशीर असतं. फूड पॉयझनिंग झाल्यावर आलं घालून चहा प्या. आल्यामुळे फूड पॉयझनिंगची समस्या वाढवणाऱ्या बॅक्टेरीयांची वाढ होण्यास आळा बसतो.

पाणी

अरबट चरबट, चुकीचे, अनहेल्दी आणि अस्वच्छ पदार्थ खाल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे फायदेशीर ठरेल. गरम पाणी पिणे तर अधिक उत्तम. 

जीरं

जिऱ्याचा वापर पदार्थ स्वादिष्ट आणि सुगंधित बनवण्यासाठी केला जातो. रोज एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खाल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल. जिऱ्यामुळे पचनक्रीया सुधारते.

केळ

डायरिया आणि बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर इलाज करण्यास केळं अत्यंत फायदेशीर ठरतं. केळं एकमेव फळ आहे जे पचनास हलकं असतं. फूड पॉयझनिंगच्या समस्येवर केळं खाणे फायदेशीर ठरते. पण त्याचा अतिरेक टाळा. दोनपेक्षा अधिक केळे खाऊ नका. केळ्याच्या अधिक प्रमाणामुळे डायरियाचा धोका वाढतो.