जेव्हा मेंंदू गरजेपेक्षा अधिक काम करतो तेव्हा नाकाचे तापमान कमी होते

तुम्हांला असं वाटत असेल की वातावरणात थंडावा निर्माण झाला तरच शरीराचे तापामान कमी होते. तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण एका नव्या संशोधनाच्या अहवालानुसार, मेंदूच्या कार्यशीलतेवरही नाकाचे तापामान अवलंबून असते.  

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 24, 2018, 11:26 AM IST
जेव्हा मेंंदू गरजेपेक्षा अधिक काम करतो तेव्हा नाकाचे तापमान कमी होते title=

 मुंबई : तुम्हांला असं वाटत असेल की वातावरणात थंडावा निर्माण झाला तरच शरीराचे तापामान कमी होते. तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण एका नव्या संशोधनाच्या अहवालानुसार, मेंदूच्या कार्यशीलतेवरही नाकाचे तापामान अवलंबून असते.  

 कोणाचे संशोधन ?  

युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार मानसिक ताणतणावावरही नाकाचे तापमान अवलंबून असते. 14 जणांवर न्यूरॉलॉजिकल फंक्शन्सद्वारा करण्यात आलेल्या संसोधनातून काही आश्चर्यकारक वाटणार्‍या गोष्टी समोर आल्या आहेत.  

संशोधकांनी थर्मल इमेजिंग कॅमेर्‍याचा वापर केला. प्रयोगात सहभागी झालेल्यांना विविध मेंटल टास्क देण्यात आली होती. त्यादरम्यान त्यांच्या नाकाचे तापमान तपासण्यात आले. 

निष्कर्ष काय ? 

वैज्ञानिकांच्या निष्कर्षानुसार, मेंदूचा अधिक वापर केला गेल्यास अधिक  बौद्धिक कार्य केल्यास नाकाचे तापमान कमी होते. ताणतणावात काम करताना अधिक मेहनतीसाठी रक्ताला चेहर्‍याकडून न्यूरॉन्सकडे वळवण्यात येते. हा अहवाल ह्युमन फॅक्टर नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.