Heart Attack Warning Signs in Marathi: गेल्या 2 वर्षांत हार्ट अॅटेक आणि कार्डिएक अरेस्टच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. पहिले वयाच्या पन्नाशीनंतर हृदयरोगाच्या तक्रारी जाणवायला लागायच्या मात्र आता 10-20 वर्षांच्या युवकांनाही हृदयरोगाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. जिम किंवा पार्कमध्ये व्यायाम करणाऱ्या व फिटनेस जपणाऱ्या लोकही हृदयरोगाचा शिकार होत आहे. युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहेत. अशावेळी त्यापासून वाचण्यासाठी काय करावे, हे जाणून घेऊया.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हार्ट अॅटेकचे अनेक कारणे आहेत. यातील एक कारण म्हणजे, आत्ताची जीवनशैली. युवकांमध्ये कामाचा वाढलेला ताण. त्यामुळं व्यायामाचा आभाव तसंच, कामासाठी एकटं राहणाऱ्या युवकांमध्ये फास्ट फुड जास्त प्रमाणात खाणे. कामाचा ताण आणि त्यापासून वाचण्यासाठी स्मोकिंग किंवा ड्रिंक करण्याचे व्यसन यामुळं हृदयावर ताण येतो. अनेकदा अनुवंशिकतेमुळं हृदयरोगाचा धोकाही वाढतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, व्यायामाचा अभाव असल्यामुळं त्यांना हृदयासंबंधित त्रास जाणवतो.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, व्यायाम आणि डाएटच्यासोबतच पुरेशी झोप, तणाव, बीपी, शुगर याचाही हृदयावर परिणाम होतो. त्यामुळं या सर्व गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. हृदयाच्या आरोग तदुंरस्त ठेवण्यासाठी व्यायम, डाएट, झोप, मेडिटेशन-योग यांचा तुमच्या रुटिनमध्ये समावेश करा. तसंच, ताण-तणाव, अल्कोहल, स्मोकिंग टाळा.
1 जेवणात प्रथिनांचा समावेश करा. कार्बोहायड्रेट घटवा. फळांचे सेवन करा. मीठ, साखर, तांदुळ, मैदा कमी प्रमाणात घ्या.
2 ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा
3 स्लीप पॅटर्न आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा
4 रोज 25 ते 30 मिनिटांपर्यंत कार्डिओ एक्सरसाइज करा.
1 जेवल्यानंतर पोटात अॅसिडीटी होणे
2 जास्त चालल्याने किंवा पायऱ्या चढल्यानंतर धाप लागणे
3 जे काम आधी खूप आरामात व्हायचे ते करायला आता अधिक त्रास होतो
4 अचानक जीव घाबराघुबरा होणे
5 अनुवंशिकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)