Benefits of Green Peas: मटारचा वापर आपण आपल्या आहारात अनेकदा करतो (Green Peas Benefits). कधी मटारची भाजी, मटार पराठा, मटार करंज्या, मटार पुलाव आणि असे अनेक पदार्थ हिव्या वाटाण्यांशिवाय पुर्ण होतच नाही. चमचमीत आणि खुशखुशीत जेवणासाठी मटार हे आवश्यक असतातच. आपण मटारापासून अनेक पदार्थ बनवतो पण याच मटारचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो पाहायचाय कसा? (health tips these are the benefits of eating green peas in your diet)
मटारमधल्या व्हिटॅमिन सीमुळे त्वचा (Vitamin C) मऊ आणि चमकदार बनते. हिरव्या वाटाण्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, एपिक्टिन, कॅरोटीनोईड्स आणि अल्फा-कॅरोटीन असतात ज्याचा फायदा आपल्या त्वचेला होतो. हिवाळा आला की बाजारात मटार उपलब्ध होतात. हे गोड चवीचे वाटाणे जेवणात मिसळले की जेवणाची चवही अप्रतिम होते. मटारमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिड असते जे त्वचेसाटी अनुकूल ठरते. यामुळे त्वचेला जळजळीचा त्रास होत नाही.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
मटारमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो जो रक्तातील साखर (Blood Sugar) नियंत्रित करतो. मटारमध्ये आढळणारे प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि फायबरही रक्तातील साखर वाढू देत नाही. मटारमध्ये व्हिटामिन के ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येपासून शरीराचे रक्षण करते. तुमच्या हाडांसाठीही मटारचा उपयोग चांगला होतो आणि हाडं मजबूत होतात.
मटारमध्ये फायबरचे (Fiber) प्रमाण जास्त असण्याने त्याचा फायदा शरीराला होतो. यामुळे वजनाची वाढ होत नाही आणि लठ्ठपणाचा त्रासही होत नाही. मटार हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)