वयाच्या कितव्या वर्षी मुलं चहा पिऊ शकतात?, मुलांसाठी हानिकारक ठरु शकतो चहा

Tea Side Effects In Marathi: लहान मुलांना चहा देणे योग्य आहे का? वयाच्या कितव्या वर्षापासून मुलांना चहा देणे फायद्याचे, सविस्तर जाणून घ्या.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2024, 03:19 PM IST
वयाच्या कितव्या वर्षी मुलं चहा पिऊ शकतात?, मुलांसाठी हानिकारक ठरु शकतो चहा title=
health tips in marathi At what age can a baby drink tea

Tea Side Effects In Marathi: भारतीयांसाठी चहा म्हणजे अमृत आहे. दिवसाची सुरुवात चहाने केली जाते. तसंच, कामाचा ताण आला किंवा थकवा आला तरी चहा उपाय मानला जातो. असं म्हणतात चहाला वेळ नसली तरी वेळेला चहाहा असतोच. भारतात चहाप्रेमी खूप सापडतात. पण तुम्हाला माहितीये का, लहान मुलांना चहा किंवा कॉफी प्यायला द्यावी का? मुलांना चहा प्यायला देणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? तसंच, वयाच्या कितव्या वर्षांपासून मुलांना चहा किंवा कॉफी प्यायला द्यावी? या सगळ्या प्रश्नांची आज जाणून घेऊया. 

बऱ्याचदा मोठ्या व्यक्तींना पाहून लहान मुलं चहा पिण्याचा हट्ट करतात. त्यामुळं मोठ्यांना कधी कधी त्यांच्या हट्टापुढे झुकावेच लागते. अशावेळी मुलांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय लागते. पण चहा किंवा कॉफीची ही सवय लहान मुलांसाठी हानिकारक आहे. एका ठराविक वयानंतरच मुलांना चहा किंवा कॉफी द्यायला पाहिजे. चहा किंवा कॉफीमुळं त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. चहा-कॉफी फिजिकल हेल्थबरोबरच त्यांच्या मेंटल हेल्थवरही प्रभाव पडतो. चहा किंवा कॉफीमध्ये आढळणारे कॅफेन मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. तसंच, यात असलेली साखरही मुलांच्या आरोग्यासाठी चांगली नाहीये. 

आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांनी चहा किंवा कॉफीचे सेवन अजिबात करु नये. कारण या पेयांमध्ये असे काही तत्वे असतात ज्याचा मुलांच्या आरोग्यावर नकळत वाईट परिणाम होऊ शकतो. मुलांच्या शरीरातील कॅल्शियम आणि आयर्नची मात्रा कमी होते. त्यामुळं हाडं ठिसूळ होतात तसंच, साखरेचे प्रमाण जास्त असल्याने दातदेखील खराब होण्याची शक्यता असते. 

वय वर्षे 12पेक्षा जास्त वय असलेली मुलं चहा-कॉफीचे सेवन करु शकता. 12- ते 18 वर्षांची मुलं एका दिवसात 100 मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफेनचे सेवन करु शकत नाही. प्रमाणापेक्षा जास्त कॅफेनचे सेवन केल्यास गंभीर आरोग्याचा धोका वाढू शकतो. चहा-कॉफीच्या जास्त सेवनाने चिडचिड, झोपेची कमतरता, डिडायड्रेशन. मधुमेह, कॅव्हिटी या सारख्या आरोग्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळं लहान मुलांना चहा किंवा कॉफीची सवय लावण्यापूर्वी या सगळ्या घटकांचा विचार करावा. चहा किंवा कॉफीऐवजी मुलांना दूध देणे जास्त फायदेशीर आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x