Fish Eating Side Effect : मासे खाताय? सावधान... होऊ शकतात गंभीर आजार, पाहा काय सांगत संशोधन

Fish Eating Side Effect : आपल्या सगळ्यांनाच मासे खायला खुप आवडतात. त्यातून आपण नेहमी हाच विचार करतो की कधी एकदा माश्यांचा सिझन (Fish Eating) येतोय आणि आपण गरमागरम भाजलेले, तळलेले मासे कधी खातोय. तेव्हा मासे खाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच तोंडाल पाणी (Polluted Water) सुटलेलं असते. 

Updated: Jan 24, 2023, 01:33 PM IST
Fish Eating Side Effect : मासे खाताय? सावधान... होऊ शकतात गंभीर आजार, पाहा काय सांगत संशोधन title=

Fish Eating Side Effect : आपल्या सगळ्यांनाच मासे खायला खुप आवडतात. त्यातून आपण नेहमी हाच विचार करतो की कधी एकदा माश्यांचा सिझन (Fish Eating) येतोय आणि आपण गरमागरम भाजलेले, तळलेले मासे कधी खातोय. तेव्हा मासे खाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच तोंडाल पाणी सुटलेलं असते. परंतु तुम्हाला माहितीये का की, मासे खाणं हे तुमच्या जीवावरही बेतू शकते. हो, समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की माश्यांमधल्या काही केमिकल्समुळे (Chemicals in Fish) तुम्हाला कॅन्सर आणि इत काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तेव्हा जाणून घेऊया की नक्की यामागे कारणं काय आहे आणि कोणते मासे खाल्याने तुम्हाच्या शरीराला त्रास होऊ शकतो. (health tips eating fish can lead to cancer what the study says know in detail)

मासे हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. त्यामध्ये प्रोटीन (Protein) आणि सॅच्यूरेडेड फॅट्स (Protein) कमी असतात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते फार फायदेशीर असते. अनेकांना डाएट करायचे असते तेव्हा त्यासाठी मासे हे चांगले ठरतात. परंतु ते आरोग्यासाठीही कितपत चांगले असतील हे तपासून घेणे महत्त्वाचे आहे. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड, व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि अनेक पोषक तत्त्वे असतात. त्याचबरोबर मासे खाण्यासाठी आपल्या काही ओकेजनचीही गरज लागत नाही आपण ते कधीही खाऊ शकतो परंतु मासे प्रेमींसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे कारण आपल्या इथे फार मोठ्या प्रमाणात मासे खाणारी लोकं आहेत ज्यांसाठी सध्या एक वाईट बातमी आहे. 

एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी (Environmental Protection Agency) आणि अमेरिकेतल्या फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (Food and Drug Administration) यांच्या संशोधनातून समोर आले आहे की, सध्या नद्यामधील पाणी हे खूप जास्त प्रमाणात दूषित होत जाते आहे. त्यामुळे त्यांच्या विषारी द्वव्ये वाढू लागली आहेत. तेव्हा अशावेळी मासे खाल्ल्याने कॅन्सर नाहीतर ब्रेन स्ट्रॉकसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संशोधनातून असे समोर आले की, मोठ्या प्रमाणात माश्यांमध्ये केमिकल्स जात आहेत ज्याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होऊ शकतो. 

फॉरेवर केमिकल काय आहे? 

फॉरेवर केमिकलचे (Forever Chemical) प्रमाण माशांमध्ये वाढू लागली असल्याचे संशोधनातून समोर येते आहे. तुमच्या वॉटर रेझिंस्टंट (Water Resistant) कपड्यांमध्ये आणि वस्तूंमध्ये हे केमिकल आढळते. उदाहरणार्थ, छत्री, रेनकोट किंवा मोबाईल. या केमिकलचा थेट परिणाम तुमच्या हॉर्मोन्सवर होतो त्यामुळे तुम्हाला थायरॉईड (Thyroid) आणि कोल्सेट्रॉलसारख्या (Chelostrol) समस्या उद्भवतात. या मिसकॅरेजही होऊ शकते त्याचबरोबर कॅन्सरसारख्या (Cancer) मोठ्या आणि गंभीर आजारांनाही निमंत्रण येते. जर तुम्ही महिन्यातून एकदा खाल्लात तर तुम्हाला त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x