Akashdeep Ruled Out From IND VS AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात उद्या 3 जानेवारी पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पाचव्या आणि शेवटच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. पाचवा सामना हा टीम इंडियाकरता (Team India) सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या पात्रतेसाठी टीम इंडिया करता अत्यंत महत्वाचा आहे. परंतु सिडनी टेस्टपूर्वी भारताचा स्टार गोलंदाज दुखापतीच्या कारणामुळे बाहेर पडला आहे.
भारताचा स्टार गोलंदाज आकाशदीप हा पाठदुखीचा कारणामुळे सिडनी टेस्टमधून बाहेर पडल्याची माहिती टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने दिली. आकाशदीपने ब्रिसबेन आणि मेलबर्नमधील बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या दोन टेस्ट सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या गोलंदाजी दरम्यान दोन्ही सामन्यात फिल्डर्सकडून कॅच सुटल्याने त्याला अजून विकेट्स मिळू शकले नाहीत. गौतम गंभीरने सिडनी टेस्टपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती, त्यात गंभीरने म्हटले की, 'आकाशदीप हा पाठदुखीचा कारणामुळे सिडनी टेस्टमधून बाहेर राहील.' आकाशदीपने दोन टेस्टमध्ये 87.5 ओव्हर गोलंदाजी केली. कामाचा अतिरिक्त ताण हा देखील त्याच्या दुखापतीचं कारण ठरू शकतं.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कपवर नजर... 2025 मध्ये कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं शेड्युल?
पत्रकार परिषदेत गंभीरने अनेक विषयांवर भाष्य केले. ऑस्ट्रेलियाने सिडनी टेस्टच्या एक दिवस आधीच प्लेईंग 11 जाहीर केली. मात्र उद्या पीच पाहून टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा निर्णय घेतला जाईल, असे गौतम गंभीरने सांगितले. आकाशदीपच्या अनुपस्थितीत हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते. टीम इंडिया सध्या सीरिजमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे, ही टेस्ट बरोबरीत सोडण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट जिंकावी लागेल.
3 ते 7 जानेवारी दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना हा सिडनी येथे पार पडणार आहे. टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.