'... तर त्याचा एन्काउंटर होऊ शकतो', वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

Beed News: बीड जिल्हातील वातावरण सध्या तापलं आहे. वाल्किम कराडला अटक केल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 2, 2025, 12:54 PM IST
'... तर त्याचा एन्काउंटर होऊ शकतो', वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा title=
beed news Vijay Wadettiwar big claim over walmik Karad encounter in police custudy

Beed News:  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बीडचे प्रकरण गाजत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर, या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला असून सीआयडी कोठडीत आहे. मात्र आता या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. 

विजय वडेट्टीवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कराडसंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. 'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. माझी पोलिसांना विनंती आहे की, या मोठ्या आकाला वाचवण्याकरता याचा एन्काऊंटर करू नका? हा बिचारा म्हणणार नाही. पण मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर आहे तर पुरावा नष्ट होण्याची शक्यतादेखील जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी दिली. त्यामुळं या प्रकरणात काहीही होऊ शकतं,' अशी शक्यता विजय वडेट्टीवारांनी वर्तवली आहे.

पुढे ते म्हणाले की, 'काल आपण पाहिले पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेले. ते म्हणाले पोलिसांकरता घेऊन गेले. यापूर्वी असं कधी पाहिलं नाही हे कोणाचे लाड आहेत. वाल्मिक कराडचे लाड पूरवरण्याकरता आणि त्याला बेडवर झोपवण्याकरता हे नेले काय याची चौकशी झाली पाहिजे?,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

'कराडाला बाप मानून पोलीस वागत वागत होते. 22 दिवस पकडू शकले नाही, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते. गृहमंत्री यांनी लक्ष दिलं पाहिजे नाही तर पोलीस विभागाचा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही,' असंही ते म्हणाले. तसंच, आज तपासासाठी एसआयटीचं पथक बीडमध्ये दाखल होत आहे, त्यावर विचारलं असता,  'सीआयडीचा तपास सुरू होता. आता एसआयटी आणली. हा तपास भरकटवण्यासाठी तर नसेल ना? अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली. एसआयटी म्हणजे राज्याबाहेरील पोलीस नाहीत. राज्यातीलच अधिकारीच आहेत. सीआयडीने वाईट काम केले म्हणून यांना नेमले का?' असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. 

'2014 ते 19 चा कॅगचा रिपोर्ट आला असून 96 हजार कोटीच्या कामाचा हिशोब लागत नाही. त्यातील मराठवाडा मधील काम अधिक आहे. कॉम्प्लिशन रिपोर्ट नाही.  या कामात यादी मराठवाडा येथील आहे. त्यातही बीडमध्ये मोठी यादी आहे. बीड संवेदनशील जिल्हा झाला आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.