Pregnancy Care : गरोदरपणात चुकूनही करु नहा 'या' गोष्टी, नाहीतर....

 महिला गरोदर असताना शरीरासोबतच सातत्यानं बदल होणारा आणखी एक घटक म्हणजे तिची मानसिकता

Updated: Mar 21, 2022, 01:30 PM IST
Pregnancy Care : गरोदरपणात चुकूनही करु नहा 'या' गोष्टी, नाहीतर....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : एखाद्या स्त्रीला जेव्हा मातृत्त्वाची चाहूल लागते त्यावेळी तिच्या शरीरात कमालीचे बदल होत असतात. महिला गरोदर असताना शरीरासोबतच सातत्यानं बदल होणारा आणखी एक घटक म्हणजे तिची मानसिकता. (Pregnancy Care )

नऊ महिने बाळाचा उदरात सांभाळ करण्याचं प्रचंड दडपण महिलेवर आलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये बाळाच्या आरोग्यासोबतच आईचं आरोग्यही महत्त्वाची भूमिका बजावतं.

निरोगी बाळंतपणासाठी सुरुवातीपासूनच काही गोष्टी टाळणं आणि काही गोष्टींची सवय अंगी बाणवणं पुढे फायद्याचं ठरतं. चला तर मग जाणून घेऊया या काळात नेमकी कोणती काळजी घ्यायची.... 

वजन नियंत्रणात ठेवा...
गरोदरपणात वजन नियंत्रणात ठेवणं कधीही महत्त्वाचं. प्रमाणाहून कमी वजनही नको आणि वाढलेलं वजन तर अजिबातच नको. कारण या दोन्ही परिस्थितींमध्ये काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळं तुमच्या बीएमआयनुसारच वजनाचा आकडाही नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे. 

आहाराच्या सवयी... 
गरोदरपणात महिलेच्या आहाराच्या सवयीसुद्धा बदलतात. परिणामी गरोदर महिलेनं खाण्यापिण्यात संतुलन राखणं कधीही फायद्याचं. या काळात बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं. त्याऐवजी हिरव्या भाज्या, फळं, ताक, दही, दूध, नारळ पाणी अशा गोष्टींना प्राधान्य द्यावं. 

धुम्रपान आणि मद्यपान थांबवा.... 
आजकाल महिलाही धुम्रपान आणि मद्यपान करताना दिसतात. पण, गरोदरपणादरम्यान ही सवय पूर्णपणे थांबवा. कारण, गरोदरपणात अशा वाईट सवयींमुले बाळाच्या आरोग्यावर याचे परिणाम होतात. 

तणापासून दूर राहा 
गरोदरपणाच्या काळात थोडा तणाव स्वाभाविक आहे. पण, तुम्ही सतत कोणत्या न कोणत्या कारणानं चिंतातुर होत आहात, तर मात्र स्वत:ला सांभाळाला शिका. अन्यथा याचा परिणाम पोटातील बाळावर होईल, 

तणावापासून दूर राहण्यासाठी तुम्ही दररोज योगसाधना आणि ध्यानधारणेला प्राधान्य द्या.