Knee Pain Home Remedies: वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. पोषण कमी असल्यामुळं कधी मार लागल्यामुळं आणि पाय मुडपून बसल्यामुळं गुडघेदुखी सुरू होते. गुडघेदुखी एकदा का सुरू झाली की पायी चालत जाणे किंवा खाली बसायला खूप त्रास होतो. अशावेळी गुडघेदुखी दूर होण्यासाठी वेगवेगळी औषधे घेतली जातात. पण तरीही औषधं एखादी दिवशी घेतली नाही तर पुन्हा त्रास सुरू होतो. अशावेळी घरगुती उपाय तुम्ही करु शकता. किचनमधीलच एका पदार्थाचे सेवन केल्यास तुम्हाला गुडघेदुखीवर आराम मिळणार आहे. त्याचे सेवन कसे करायचे हे जाणून घ्या.
गुडघेदुखीवर मात करण्यासाठी घरातील आलं तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आल्यामध्ये अँटी इफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळं गुडघेदुखीवर आराम मिळतो. बऱ्याचदा सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी आल्याचा चहा प्यायला जातो. पण तुम्ही या पद्धतीने आल्याचे सेवन केल्यासही लाभदायक ठरणार आहे. आलं चांगलं कुटुन घ्या. आता एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात हे कुटलेले आले टाका. पाणी चांगले उकळल्यानंतर ते एका ग्लासात घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस आणि मध टाकून प्या. रोज या चहाचे सेवन केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळणार आहे.
गुडघेदुखीवर आराम मिळवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात टाकून चांगल्या शिजवून घ्या. त्यानंतर हे तेल गुडघ्यांना लावा यामुळं त्रास थोडा कमी होईल.
हळद पाण्यात मिसळून किंवा हळदीचे दूध प्यायल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो. किंवा हळदीचा लेप बनवून तो गुडघ्यांना लावल्यासही वेदना कमी करतात. हळदीचा लेप वेदना कमी करते.
वाढते वजनही गुडघ्यावर दबाव टाकतात त्यामुळं वेदना होतात. अशावेळी वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
जेवणात पोषण भरपूर असणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात फळे, भाज्या, ओमेगा-3, फॅटी अॅसिड असलेले आळशीच्या बिया आण चिया सीड्सचा समावेश करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)