Ganesh Chaturthi Special मोदक खाण्याचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

गेल्या काही दिवसांपासून आपण मोदकावर खूप तवा मारत आहोत. तुम्हाला माहिती आहे का, की मोदक खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Updated: Sep 3, 2022, 04:53 PM IST
Ganesh Chaturthi Special मोदक खाण्याचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहिती आहे का? title=
Ganeshotsav 2022 eating bappa favourite modak health benefits

Ganesh Chaturthi Special: देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. गणपती म्हटलं की त्याचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. घरोघरी मोठ्या प्रमाणात गणरायला खूष करण्यासाठी मोदक तयार केले जातं आहेत. गणपतीसोबतच आपल्यालाही मोदक खूप आवडतात. बरोबर ना, गेल्या काही दिवसांपासून आपण मोदकावर खूप तवा मारत आहोत. तुम्हाला माहिती आहे का, की मोदक खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.(Ganeshotsav 2022  eating bappa favourite modak health benefits )

मोदक हा गोड पदार्थ असला तरी यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. कारण मोदक हे तूप, नारळ, गूळ, सुका मेवा, तांदळाचे पीठ यापासून तयार केला जातो. आता आपण जाणून घेऊताय मोदक खाल्ल्याने शरीराला काय काय फायदे होतात. 

वजन कमी होतं 

मिठाई म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, मात्र त्याची दुसरी भीती म्हणजे वजन वाढण्याची असते. पण मोदकाचा एक आरोग्य लाभ म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. साखरेऐवजी गूळ घालून मोदक तयार केल्यास वजनही कमी करता येतं. पोषणतज्ञ्ज रुजुता दिवेकर यांच्या मते, ज्या लोकांना साखरेचा त्रास होतो, त्यांनी गुळापासून बनवलेले मोदक खावेत.

थायरॉईड

मोदकाच्या सेवनाने थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असल्याचे सांगितलं जातं, जे थायरॉईड ग्रंथी निरोगी ठेवतात. एवढेच नाही तर गुळाच्या मोदकाने साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल

इतर मिठाईंप्रमाणे मोदकही अनेक प्रकारे तयार केला जातात. नारळासोबत मोदक खाल्ल्यास साखरेची तृष्णा दूर होते, तसंच शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते. फायबर हे असे पोषक तत्व आहे, जे पोटात बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही. आरोग्य तज्ञ्ज देखील अशा पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात, ज्यामध्ये भरपूर फायबर असते. रुजुता दिवेकर म्हणतात नारळ असलेले मोदक खा, पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)