तुमच्याकडे असेलेलं तेल शुद्ध की भेसळयुक्त? काही सेंकदात जाणून घ्या...

घरबसल्या तुम्ही तपासू शकता तुम्ही वापरत असलेलं तेल भेसळयुक्त आहे की नाही ते... कसं जाणून घ्या

Updated: Sep 11, 2021, 11:09 PM IST
तुमच्याकडे असेलेलं तेल शुद्ध की भेसळयुक्त? काही सेंकदात जाणून घ्या... title=

मुंबई: सण उत्सवाच्या काळामध्ये तेलाची आवश्यकता खूप जास्त असते. त्यामुळे आपण बऱ्याचदा घाऊक दरात तेल खरेदी करतो. सध्या मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता तेलामध्येही भेसळत होत आहे. तुम्ही घरी आणलेलं तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं? भेसळयुक्त तेलासंदर्भात आता जनजागृती होत आहे. 

सणांच्या काळात घरात मोहरीच्या तेलाचा वापर वाढतो. पण सणासुदीच्या काळात तेलात भेसळीच्या तक्रारीही वाढतात. खरं तर, भेसळयुक्त तेलाचा रंग पिवळा करण्यासाठी, त्यात घातक मेटानिल येलो वापरला जातो. जो आपल्यासाठी खूप घातक असतो. आपल्या घरी आणलेलं तेल भेसऴयुक्त आहे की नाही हे ओळखायचं कसं याची माहिती चक्क FSSAI ने ट्वीटरवरून दिली आहे. 

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने तेलातील भेसळीविरोधात ट्विटरवर DetectingFoodAdulterants नावाची मोहीम सुरू केली. भेसळयुक्त तेल जास्त काळ खाणे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. एफएसएसएआय या मोहीमेअंतर्गत लोकांना घरी अन्न भेसळ कशी तपासायची हे सांगितलं आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की FSSAI ने खाद्यतेलातील भेसळ कशी ओळखायची ते सांगितलं आहे.

-पहिल्यांदा टेस्टट्यूबमध्ये 1 मिली तेलाचा नमुना घ्या
- या तेलाच्या नमुन्यामध्ये 4ml डिस्टिल्ड वॉटर मिसळा त्यानंतर ही ट्यूब हलवत राहा
- या एकत्र केलेल्या मिश्रणाला 2ml दुसऱ्या टेस्टट्यूबमध्ये घ्या 2l कंसेंट्रेटेड HCL मिसळा
- आता तुम्हाला भेसळयुक्त केलेला पदार्थ वर तरंगताना दिलेल
- जर तेल भेसळयुक्त नसेल तर तेलावर तरंग येणार नाही
- भेसळयुक्त तेलातील वरच्या थराचा रंग बदलला याचा अर्थ तुमच्या तेलात भेसळ आहे

मेटॅनिल यलो हा खाद्य रंग आहे जो भारतात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, मेटॅनिल यलो मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. तो आपल्या मेंदूची शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. FSSAI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की HCL अॅसिड भेसळयुक्त तेलाच्या नमुन्यातून प्रतिबंधित रंग काढतो. त्यामुळे तेल भेसळयुक्त असेल तर रंग बदलतो अन्यथा रंग बदलत नाही.