मुंबई : फुफ्फुसं हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासोबतच श्वास नियंत्रित ठेवण्यासाठी फुफ्फुसं मदत करतात. वाढतं प्रदुषण, धुम्रपानाची सवय आणि प्रदुषित हवेमुळे फुफ्फुसांचं कार्य बिघडतं. यामुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच कळत नकळत फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम करणार्या अशा घटकांपासून फुफ्फुसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आहारात काही बदल करणं आवश्यक आहे.
ब्रोकोली हे सुपरफूड्सपैकी एक आहे. आहारात ब्रोकोलीत समावेश केल्याने फुफ्फुसांचं कार्य सुधारण्यास मदत होते. ब्रोकोलीमधील व्हिटॅमिन घटक प्रभावी असतात. त्यामधील अॅन्टी ऑक्सिडंट घटक फुफ्फुसांच्या कार्याला चालना देतात.
सफरचंदामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. An Apple a day keeps docters away अशी म्हणदेखील आहे. सफरचंदातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमीन सी घटक फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
डाळिंबाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भारतामध्ये अनेक आजरांना लांब ठेवण्यासाठी डाळिंब मदत करते. त्यामधील अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म सोबतच आयर्नची मुबलक मात्रा आरोग्याला फायदेशीर आहे. डाळिंब नियमित खाल्ल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी बेरी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामधील अॅन्टी ऑक्सिडंट गुणधर्म फुफ्फुसांमध्ये विषारी घटकांचा होणारा परिणाम आटोक्यात ठेवण्यास मदत करते. सोबतच अॅन्टी ऑक्सिडंट गुणधर्मामुळे फुफ्फुस कमजोर होण्याचा धोका कमी होतो.
अक्रोड हे सुकामेव्यातील अत्यंत आरोग्यदायी समाजले जाते. यामुळे सेक्सलाईफ सुधारण्यास मदत होते. सोबतच त्यामधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते.