भुक्कड लोकांंनो ! या पदार्थांवर ताव मारल्याने हाडं होतील ठिसुळ

आपण फीटनेसचा विचार करताना डाएट आणि व्यायामाकडे लक्ष देतो. 

Updated: Jul 24, 2018, 07:40 PM IST
भुक्कड लोकांंनो ! या पदार्थांवर ताव मारल्याने हाडं होतील ठिसुळ  title=

मुंबई : आपण फीटनेसचा विचार करताना डाएट आणि व्यायामाकडे लक्ष देतो. अनेकदा याच्या मदतीने तुमचं वजन, शरीरातील चरबी, रकताचं प्रमाण किंवा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळतो. पण तुम्ही कधी हाडांच्या आरोग्याबाबत विचार केला आहे का ? 

हाडाच्या आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी यांचं प्रमाण योग्य असणं आवश्यक आहे. अन्यथा जसजसं वय वाढतं तशी हाडं कमजोर होतात. हाडं ठिसुळ झाल्याने अनेक आजार वाढतात. तुमच्या आहारातील काही पदार्थांमुळेही हाडं कमजोर होण्याचा धोका असतो. मग तुम्हीही भुक्कड असाल ? कोणत्याही पदार्थांवर विचार न करता थेट ताव मारत असाल, तर या पदार्थांमुळे तुमची हाडं ठिसुळ होण्याची शक्यता आहे. 

या पदार्थांवर ताव माराल तर हाडं होतील ठिसुळ 

मीठ - 

मीठाचे अतिप्रमाणात आहारात समावेश करत असाल तर हाडं ठिसुळ होण्याचं प्रमाण वाढेल. मीठातील सोडियम घटक मूत्राद्वारा कॅल्शियम घटक बाहेर टाकण्यास कारणीभूत ठरतात. 

चॉकलेट - 

अतिप्रमाणात चॉकलेट खात असाल तर त्याचा प्रमाण हाडांवर होतो. यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण आणि ऑक्सलेट प्रमाण वाढते. यामुळे कॅल्शियम शरीराबाहेर पडतात. 

मद्यपान - 

मद्यसेवनाची सवय असणार्‍यांमध्ये शरीरात कॅल्शियमचं प्रमाण खालावते. यामुळे हाडं कमजोर होतात. 

कोल्ड ड्रिंक्स - 

कोल्ड ड्रिंक्सचं अतिसेवनदेखील आरोग्याला धोकादायक आहे. यामधील कार्बन डाय ऑक्साईड आणि फॉस्फरस घटक हाडांना ठिसुळ करतात. 

चहा, कॉफी 

चहा आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे हाडं कमजोर होतात. त्यामुळे तुम्हांला सतत चहा, कॉफी पिण्याची सवय असेल तर वेळीच सावश व्हा. कारण यामधील कॅफिन घटक हाडांना नुकसानकारक ठरतात.