जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं पडू शकतं महागात; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणं

Health Tips After Eating Food in Marathi: दुपारी आणि रात्रीचे जेवण हेल्थी तसेच योग्य प्रमाणात करणे हे आवश्यक असते. त्यातून खाण खाल्ल्यानंतरही अनेकांना चुकीच्या सवयीही असतात ज्यामुळे त्यांचे आरोग्य हे बिघडू शकते. तेव्हा या सवयी टाळणं का गरजेचे आहे हे या लेखातून आता आपण जाणून घेणार आहोत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 21, 2023, 03:36 PM IST
जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं पडू शकतं महागात; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणं title=
July 21, 2023 | Food eating tips these bad habits to avoid after having lunch or dinner for better health

3 Bad Habits After Eating: जेवल्यानंतर आपल्यालाही वेगळेवेगळ्या सवयी असतात. उदाहरणार्थ, जेवण पोटभर झालं तरीसुद्धा अनेकांना भूक लागते. किंवा जेवल्यानंतरही काहींना अरबट-सरबट पदार्थ खाण्याची सवय असते. त्यामुळे अशा सवयी या आपल्याला हानिकारक असतात. अशा सवयींमुळे आपल्याला नानाविध आजार होण्याची दाट शक्यता असतो खासकरून तुम्हाला पोटाचे विकारही होऊ शकतात. तेव्हा अशा सवयी या आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगल्या नसतात. या लेखातून आपण नक्की जाणून घेणार आहोत की या सवयींचे दृष्पपरिणाम कोणते होऊ शकतात आणि त्याचसोबत असे कोणते पदार्थ आहेत जे आपण जेवणानंतर खाणं टाळलं पाहिजे. आपल्याला आपल्या आहेत त्यामुळे बॅलेन्स डाएट ठेवण्याची आवश्यकता असते. आपल्या जेवणात लो प्रोटीन फुड्स, फळभाज्या असे पदार्थ ठेवावेत. 

 

फक्त खाणंपिणंच नाही तर आपल्यालाही जेवल्यानंतर काही क्रिया करणंही साफ वज्र आहे. अशातच आता आपण जाणून घेणार आहोत की, जेवल्यानंतर कोणत्या गोष्टी या आपण टाळायला हव्यात आणि कोणत्या गोष्टींचा आपण अवलंब करायला हवा. अनेकदा अनेकांचे जेवण हे उशिराही होते होते त्यावेळी जेवायचंय म्हणूनही फक्त जेवतात आणि मग त्यांना सारखी सारखी भूकही लागू शकते तेव्हा अशावेळी अवेळी खाल्ल्याचा परिणामही त्यांच्यावर होऊ शकतो. तेव्हा पाहुया की याचा परिणाम तुमच्या शरीरावर कसा होऊ शकतो. या लेखातून या आरोग्याच्या काही टीप्सबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या खाण्यात योग्य आणि पोषक घटक ठेवावे आणि योग्य प्रमाणात हे जेवण असावे.

हेही वाचा - निर्मात्यांनी हुशारीनं लपवले Oppenheimer चित्रपटातील नग्न तसेच प्रणयदृश्यं, सेन्सॉरनं दिलं 'हे' प्रमाणप्रत्र

हेवी फास्ट फूड खाऊ नका! 

फास्ट फूड किंवा कुठलेही अरबट-सरबट पदार्थ खाऊ नका जेणेकरून तुमच्या पोटाला त्रास होणार नाही. कधी कधी अतिरिक्त जेवल्यानं त्याचा तुमच्या पोटावरही परिणाम होऊ शकतो. त्यानं अपचन किंवा एसिडिटीचाही त्रास तुम्हाला होऊ शकतो. 

गोड पदार्थ आणि आईस्क्रीम खाऊ नका!

गोड पदार्थ किंवा थंड पदार्थ म्हणजेच आईस्क्रिमसारखे पदार्थ अजिबातच खाऊ नका. कारण असं म्हटलं जातं की जर का तुम्ही थंड पदार्थ खात असाल तर तुमच्या पोटावर त्याचा फार गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यासोबत गोड पदार्थ खाल्लानं खोकला किंवा इतर त्रासही होण्याची शक्यता असते. 

एक्सरसाईज करू नका!

लगेचच जेवल्यावर एक्सरसाईज करू नका कारण त्यानंही तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला मानदुखी, कंबरदुखी सारखे आजार होऊ शकतात. 

'हे' करा!

जेवणं झाल्यावर 100 पाऊलं निदान शतपावली करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)