वैज्ञानिकानं घरातच केली स्वत:ची ब्रेन सर्जरी; कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Scientist Perform His Own Brain Surgery: शस्त्रक्रीया करण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासांमध्येच आपण हा प्रयत्न सोडून देणार होतो असं या शास्त्रज्ञाने म्हटलं आहे. या शास्त्रज्ञानचं जवळजवळ 1 लीटर व्यक्त या शस्त्रक्रियेच्या सुरुवातीलाच वाया गेल्याने त्याला आपण बेशुद्ध पडतो की काय अशी भीती वाटत होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 21, 2023, 03:14 PM IST
वैज्ञानिकानं घरातच केली स्वत:ची ब्रेन सर्जरी; कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल title=
कझाकिस्तानमधील राहत्या घरात शस्रक्रिया केल्याचा दावा (Photo : Twitter/MichaelRaduga)

Scientist Perform His Own Brain Surgery: रशियामधील एका वादग्रस्त वैज्ञानिकाने आपल्या लिव्हिंग रुममध्ये स्वत:चीच शस्त्रक्रीया केल्याचा दावा केला आहे. आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याने मेंदूमध्ये एका इलेक्ट्रोडचं प्रत्यारोपण केल्याचा दावा केला आहे. या वैज्ञानिकाचं नाव मायकल रादुगा असं आहे. मायकल हे रशियामधील प्रसिद्ध संशोधक असले तरी त्यांच्याकडे न्यूरो सर्जरी करण्याइतकं शिक्षण नसल्याची माहिती समोर आली आहे. या संशोधकाने केलेल्या दाव्यानुसार, कझाकिस्तानमधील राहत्या घरीच त्यांनी स्वत:ची शस्त्रक्रीया केली. यावेळेस आपल्या शरीरामधील 1 लीटर रक्त वाया गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपण पाहत असलेली स्वप्न ही स्वप्नच आहेत याचं भान असेल तर अशा स्वप्नांना 'ल्यूसिड ड्रीम्स' असं म्हणतात. याच स्वप्नांवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने मायकल यांनी ही शस्त्रक्रीया केल्याचं म्हटलं आहे. 

फारच धोकादायक प्रयोग

मायकल रादुगा हे पेशाने डॉक्टर नाहीत. मात्र मायकल यांची फेज रिसर्च सेंटर नावाची संस्था आहे. मायकल हेच या संस्थेचं संस्थापक आहेत. या संस्थेच्या दाव्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला स्लीप पॅरालीसिस, झोपेत शरीरिक दृष्ट्या येणारे काही अनुभव यासारख्या गोष्टींचं मार्गदर्शन मायकल करु शकतात. मायकल यांचा मोठा चाहता वर्ग रशियामध्ये आहे. मात्र अनेक न्यूरो सर्जन म्हणजेच चेतासंस्था आणि मेंदूसंदर्भात अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांनी मायकल हे फारच धोकादायक प्रयोग करत असल्याचा इशारा दिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Michael Raduga (@michael_raduga)

...तर झाला असता मृत्यू

"हे असं करणं फारच धोकादायक आहे," अशी प्रतिक्रिया ऑक्सफर्ड विद्यापीठाचे सल्लागार न्यूरोसर्जन एलेक्स ग्रीन यांनी मायकल यांच्या प्रयोगाबद्दल बोलताना दिली आहे. "यात अनेक धोके आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर त्यांच्या नसेमध्ये किंवा इंट्रासेरेब्रल व्हेसलमध्ये (मेंदूमधील एक भाग) रक्तस्त्राव झाला असता तर तिव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असता," असं ग्रीन यांनी म्हटलं आहे. 

मी माघार घेणार होतो पण...

मायकल यांनीही आपण या शस्त्रक्रीयेच्या पहिल्या 30 मिनिटांनंतर माघार घेण्याची मानसिक तयारी केली होती असं सांगितलं. सुरुवातीला आपल्या डोक्यामधून मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला. जवळजवळ 1 लीटर रक्त वाहून गेल्याने आपण बेशुद्ध पडू की काय अशी भीती मायकल यांना वाटत होती. असं असतानाही मायकल यांनी ही शस्त्रक्रीया पूर्ण केल्याचा दावा केला आहे. घरातच स्वत:वर शस्त्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर मायकल यांनी अंघोळ केली. त्यानंतर ते 10 तास काम करत होते. मायकल यांनी स्वत:वर शस्त्रक्रीया केल्याची फुसटशीही कल्पना कोणाला नव्हती असा दावा केला जात आहे.