लठ्ठपणा कमी करण्याचा औषधाला FDAची मंजूरी; लवकरच येणार बाजारात, पण

स्थूलता कमी कमी करणाऱ्या एका औषधालाअमेरिकेतील सर्वोच्च मेडिकल संस्था एफडीएने मान्यता दिली आहे.

Updated: Jun 5, 2021, 08:57 PM IST
लठ्ठपणा कमी करण्याचा औषधाला FDAची मंजूरी; लवकरच येणार बाजारात, पण title=

मुंबई : लठ्ठपणा कमी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लठ्ठपणा म्हणजेच स्थूलता कमी कमी करणाऱ्या एका औषधालाअमेरिकेतील सर्वोच्च मेडिकल संस्था एफडीएने मान्यता दिली आहे. हे औषध 15 टक्के स्थूलपणा कमी करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे औषधं डायबेटीजसाठी आहे. मात्र अमेरिकेत याचा वापर स्थूलता कमी करण्यासाठी देखील केला जाणार आहे. 

या औषधाला वजन कमी करण्याच्या नावाने बाजारात आणलं जाणार असल्याची माहिती आहे. या औषधाचं नाव वीगोवी Wegovyअसं आहे. या औषधाला नोवो नॉरडिक्स कंपनीने तयार केलं आहे.

वीगोवी नोवो नॉरडिक्सच्या डायबेटीजवरील औषध सीमैगलुटाइडचं (semaglutide) अपडेटेड वर्जन आहे. हे औषधामध्ये दीर्घकालीन वेळापर्यंत वजनाला कमी करण्याची क्षमता आहे. ज्या लोकांनी कंपनी नॉरडिक्सच्या ट्रायलमध्ये भाग घेतला होता त्या व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त होत्या. यामध्ये सर्वांचं वजन सरासरी 15 टक्क्यांनी कमी झाल्याची नोंद करण्यात आली. हे ट्रायल 14 महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरु होतं.

लुईविले मेटाबॉलिक अॅन्ड एथेलेस्क्लेरॉसिस रिसर्च सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉ. हेरॉल्ड बेस यांच्या म्हणण्याप्रमाणे, वीगोवी ही स्थूलता कमी करणाऱ्या इतर औषधांपेक्षा नक्कीच सुरक्षित आहे. लठ्ठपणा कमी करण्याच्या औषधांवर नेहमी संशय व्यक्त केला जातो. मात्र है औषध सुरक्षित असून याचे सौम्य प्रमाणात साईड-इफेक्ट दिसू शकतात. जसं की, डायरिया किंवा उल्टी. मात्र थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी या औषधाचा वापर करू नये.