Covid Vaccine: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार 5 हजार? सरकार म्हणालं...

जर तुम्हाला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले असतील तर सरकार तुम्हाला 5,000 रुपये देणार आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.

Updated: Jul 13, 2022, 06:27 AM IST
Covid Vaccine: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार 5 हजार? सरकार म्हणालं... title=

मुंबई : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आतापर्यंत कोटी लोकांना लसीचे डोस घेतले आहेत. जर तुम्हीही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले असतील तर सरकार तुम्हाला 5,000 रुपये देणार आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.

लस घेणाऱ्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत

मुळात एका व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जातोय की, ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे, त्या लोकांना फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर सरकार तुम्हाला पूर्ण 5000 रुपये देईल. हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. लस दिल्यानंतर 5,000 रुपये मिळाल्याच्या या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी पीआयबीने Fact check केलं आहे. याद्वारे तुम्हाला 5000 रुपयेही मिळतील की नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पीआयबीने ट्विट करून ही माहिती दिली

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे की व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जातोय की, ज्यांनी कोरोनाची लस मिळाली आहे त्यांना ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर पंतप्रधानांच्या कल्याण विभागाकडून ₹ 5,000 दिले जातील. मात्र या मेसेजचा दावा खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. कृपया हा फेक मेसेज फॉरवर्डही करू नका, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

फेक मेसेजपासून सावध रहा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून सर्वांनी सावध राहावं, असं पीआयबीने म्हटलंय. पीआयबीने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितलंय. अशा मेसेजद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसा धोक्यात आणता.