मुंबई : लग्नानंतर कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अचानक मोठे बदल होतात. विशेषतः स्त्री किंवा मुलीचे आयुष्यात नवीन गोष्टी येतात. लग्नाबद्दल मुलींच्या मनात एक वेगळीच भीती असते. अशा परिस्थितीत अनेक वेळा मुली लग्नापूर्वी गुगलवर विचित्र गोष्टी शोधत बसतात.
लग्नाआधी मुलांपेक्षा मुली जास्त उत्साही असतात. गुगलवर अनेक विचित्र गोष्टी मुली शोधत असतात. लग्नाआधी मुली गुगलवर कपड्यांबद्दल प्रचंड सर्च करतात. याशिवाय मुली लग्नानंतर त्यांचा पेहराव कसा असावा याचाही शोध घेतात. लग्न झाल्यानंतर मुलींच्या कपड्यांमध्ये मोठा बदल होतो.
मुली त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक असतात आणि याशिवाय त्यांच्या मनात एक वेगळीच भीती असते. विशेषतः त्या गुगलवर सर्च करतात की लग्न करण्यासाठी योग्य वय काय आहे. लग्नापूर्वी मुली स्वतःला हे प्रश्न विचारतात की आता लग्न करून त्या घाई तर करत नाहीत ना?.
लग्नाआधी अनेकदा मुलींना काळजी असते की नवीन घरात गेल्यावर त्यांना कसे वाटेल. नवीन घरात ती स्वत:ला सामावून घेऊ शकेल की नाही. यामुळे ती गुगलवर लग्नानंतर पतीला कसे खुश ठेवायचे हे शोधते. याशिवाय मुली सासू-सासऱ्यांबद्दलही गुगलला प्रश्न विचारतात.