तुम्ही खाताय त्या चिप्स, सॅलडमधील मीठच तुमच्या आरोग्याचा शत्रू; पाहा Special Report

Salt Side Effects : सावधान! चवीनुसार म्हणता म्हणता हे ‘मीठ’च करेल घात; पाहा Special Report. तुम्हीही पदार्थांमध्ये मीठ घातल्यानंतरच त्याला चव आली असं म्हणत ते खाताय? 

सायली पाटील | Updated: Jun 6, 2023, 03:44 PM IST
तुम्ही खाताय त्या चिप्स, सॅलडमधील मीठच तुमच्या आरोग्याचा शत्रू; पाहा Special Report  title=
Excessive usage of salt in food side effects special report

Salt Side Effects : दैनंदिन आयुष्यात आपण अनेक अशा सवयी अंगी बाणवतो ज्यामुळं पुढे जाऊन त्याचा फटका बसण्याचीही शक्यता असते. त्यामुळं तुम्ही कोणती सवय स्वत:ला लावताय याबाबत सजग राहा. आरोग्याच्या बाबतीत तर, हेळसांड नकोच. हे इतकं गंभीर का बोललं जातंय? प्रश्न पडला? पाहा 'झी 24 तास'चा हा Special Report. 

समजा दिवसभर तुम्ही काहीही खाल्लेलं नाही आणि चिप्सचं एक पॅकेट मात्र तुम्ही फस्त केलंय. त्यामुळे एकदम आपण कसे हेल्दी वैगरे राहिलो, अशा भ्रमात राहू नका. कारण, कदाचित दिवसभरात तुम्हाला लागणाऱ्या मीठाचं प्रमाण तुम्ही त्या एका चिप्सच्या पॅकेटमध्येच संपवलं असेल. एकवेळ घरी जेवण बनवताना मीठाचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं शक्य असेल, मात्र जर जेवणासोबत तुम्ही लोणचं, पापड, चाट मसाला टाकलेलं सॅलड, फरसाण खात असाल तर तुमचं मीठाचं प्रमाण वाढलंच म्हणून समजा! हे रोजचं असं मीठ खाणं तुमच्या तब्ब्येतीवर परिणाम करणारं ठरू शकतं.

चवीनुसार मीठही घातक... 

अनेकदा पाककृतींमध्ये 'चवीनुसार मीठ टाका', असं वाक्य हमखास वाचायला मिळतं. अनेकांना तर वरून मीठ घेण्याची सवयच असते. अनेकांच्या ताटात मीठाचा छोटा डोंगरही दिसतो. हॉटेलमध्ये तर प्रत्येक टेबलवर सॉल्ट व पेपर शेकरही असतात. मात्र, चवीनुसार नाही तर डॉक्टरी प्रमाणानुसार मीठ खावं, असं डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सांगतात.

मीठाचे बहुविध प्रकार... 

आजकाल बाजारात काळं मीठ, सेंधव मीठ, सी सॉल्ट, पिंक सॉल्ट असे मिठाचे अनेक प्रकार तुम्हाला मिळतील. मात्र, त्यांच्या ‘हेल्दी’वाल्या जाहिरातींना न भुलता, ते कमी प्रमाणात घेणंच योग्य आहे. खरं तर नेहमीचं आयोडिन मीठही यासाठी पुरेसं आहे. 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे पदार्थांमध्ये वरून मीठ टाकायच्या सवयीमुळे हृदयरोग, किडनीसंबंधित विकार, उच्च रक्तदाब असे आजार होऊ शकतात. मात्र, या उलट मीठ एकदम बंद किंवा कमी केल्यास शरीरात सोडियमची कमतरता होऊन सुस्ती येऊ शकते. एका व्यक्तीला दररोज 2000 कॅलरींची गरज असते. त्यात फक्त 5 ग्रॅम मीठाची आवश्यकता असते.

Excessive usage of salt in food side effects special report

Excessive usage of salt in food side effects special report

Excessive usage of salt in food side effects special report

हेसुद्धा वाचा : पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' Vastu Tips 

Excessive usage of salt in food side effects special report

भारतात खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणाऱ्या फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अथोरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAIच्या नियमांनुसार पाकिट बंद खाद्यपदार्थांवर त्यातील मीठाचे प्रमाण आणि अन्य घटकांची माहिती देणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, अशा पदार्थातील मीठ हे एका दिवसात एका माणसाला लागणाऱ्या मीठाच्या किती प्रमाणात आहे, हेही नमूद करणे अपेक्षित आहे. त्यामुळं इथून पुढे बाहेरचं खायचं झाल्यास पाकिटावर असणारा तक्ता नजरेखालून घाला आणि कायम लक्षात ठेवा, 'राहायचं असेल फिट तर टाळायचंय अतिरिक्त मीठ!'.