दूधासोबत हे '4' पदार्थ खाल्ल्याने दुप्पट होतील फायदे !

दूध हे पूर्णअन्न असल्याने अनेकदा जेवणाची वेळ टळून गेल्यास आपण दूध पितो.

Updated: Jul 25, 2018, 08:01 PM IST
दूधासोबत हे '4' पदार्थ खाल्ल्याने दुप्पट होतील फायदे !  title=

मुंबई : दूध हे पूर्णअन्न असल्याने अनेकदा जेवणाची वेळ टळून गेल्यास आपण दूध पितो. दूधामुळे वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर मात करता येऊ शकते. दूधात कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो. दूध हे आरोग्याला फायदेशीर असले तरीही त्याच्यासोबत तुम्ही काय खाता ? यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मग दूधाच्या सेवनामुळे तुम्हांला आरोग्याला होणारा फायदा दुप्पट करायचा असेल तर काही खास पदार्थांचा दूधासोबत आस्वाद घ्यायला विसरू नका. दूध कधी पिणं ठरेल आरोग्याला अधिक फायदेशीर

दूधासोबत कोणते पदार्थ खावेत ?

दूध आणि खजूर - 

दूधात खजूर मिसळून प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो. दूधाअम्ध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक असतात. सोबतच अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकही असतात. यामुळे दुबळ्या लोकांना रक्त वाढवण्यासाठी, मसल्स वाढवण्यासाठी तसेच शरीराला उर्जा मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतो. 

दूध आणि खसखस  -

दूधात खसखस मिसळून पिणेदेखील आरोग्यवर्धक आहे. खसखसीमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असतात. दूधात खसखस मिसळल्याने वजन नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. सोबतच शरीर मजबूत होते.  

दूध आणि दालचिनी -  

दूधात दालचिनी मिसळून प्यायल्याने वजन घटवण्यास मदत होते. दालचिनीयुक्त दूधामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. 

दूध आणि काळामिरी - 

दूधात काळामिरी मिसळून प्यायल्याने हाडांना मजबुती मिळते. काळामिरी वजन घटवण्यास, व्हायरल इंफेक्शन दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे काळामिरीयुक्त दूधही परिणामकारक आहे. दुधात गूळ मिसळून पिण्याचे जादुई फायदे 

दूधासोबत काय खाल्ल्यास आरोग्याला फायदे होतात ? हे तुम्हांला समजले असेलच परंतू दूधासोबत काय खाऊ नये हेदेखील ठाऊक असणं तितकेच गरजेचे आहे. दुधासोबत चुकूनही हे ५ पदार्थ खाऊ नको