मुंबई : मधुमेहाचं निदान झाल्यानंतर आहारावर बंधनं येणं स्वाभाविक आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून औषधोपचारांसोबतच तुमचं आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील गरजेचे आहे. या दरम्यान कोणते पदार्थ आणि किती प्रमाणात खाणं गरजेचे आहे हे गणित सांभाळणं गरजेचे आहे.
आहारामध्ये खाद्यपदार्थांसोबत काही पेयांचा आहारात कसा समावेश करावा याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. परंतू काय खावे याबाबत तुम्हांला सल्ला मिळत असला तरीही काय खाऊ नये याबाबत जागृत राहणंदेखील गरजेचे आहे.
फळांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे मधुमेहींच्या रूग्णांना त्रास होऊ शकतो. फळांमधील साखरेचे प्रमाण थेट फळांऐवजी रसांच्या स्वरूपात पोटात गेल्यास आरोग्याला अधिक त्रासदायक ठरतात.
सोडा वॉटरदेखील आरोग्याला त्रासदायक आहे. मधुमेहींच्या मेटॅबॉलिझमवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे हायपरटेन्शनचा त्रास बळावू शकतो. सोबतच कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाणही वाढू शकते. सोडा वॉटरमुळेही वजन वाढू शकते.
मधुमेहींच्या रूग्णांसाठी मद्यपान हे त्रासदायक आहे. अधिक प्रमाणात मद्यपान करणार्यांमध्ये सामान्य स्वरूपातील मधुमेहदेखील टाईप 2 मधुमेहामध्ये बदलू शकतो. एका संशोधनातून पुढे आलेल्या माहितीनुसार, रेड वाईनमुळे महिलांमधील मधुमेहाचा धोका कमी होतो. परंतू याचा अर्थ मधुमेहींनी बिनधास्त रेड वाईन पिणं त्रासदायक ठरू शकते.
मधुमेहींच्या शरीरात इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान असते. त्यामुळे कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंकपासून दूर रहा. यामुळे इन्सुलिनची पातळी वाढू शकते. याऐवजी नारळपाणी प्या.