मुंबई : रात्री झोपताना स्वप्नं पडणं सामान्य आहे. अनेक वेळा स्वप्नात आपण असं काही पाहतो, ज्यानंतर आपण दचकून उठतो. कधीकधी आपण स्वप्नात असं काही पाहतो, जसं उंच जागेवरून पडताना किंवा पायऱ्यांवरून पडतोय अशा घटना. मात्र तुम्हाला माहितीये का, या विचित्र स्वप्नांचं गूढ हे स्वप्न शास्त्रात दडलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया स्वप्नात उंचावरून पडण्याचा अर्थ स्वप्न शास्त्रात काय आहे.
अनेकदा तुम्ही स्वप्नात स्वतःला आकाशातून किंवा उंचावरून खाली पडताना पाहिलं असेल. स्वप्न शास्त्रानुसार, अशा प्रकारची स्वप्न पाहणं अशुभ मानलं जातं. अशी स्वप्न पाहणं हे भविष्यात काही संकटं येण्याचे संकेत मानले जातात. अशा परिस्थितीत, आपण सावध आणि संयमी असणं आवश्यक आहे.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात घोड्यावरून पडतानाच स्वप्न पाहत असाल तर ते तुमच्या आयुष्यात लवकरच काही आर्थिक समस्या येण्याची चिन्हं आहे. स्वप्न शास्त्रानुसार, अशा पद्धतीचं स्वप्न पाहणं हे एखाद्या प्रकारच्या शारीरिक दुखापतीचंही संकेत असू शकतं.
अनेक वेळा तुम्ही एखाद्या उंच इमारतीवरून किंवा डोंगरावरून खाली पडल्याचं स्वप्न पाहता. स्वप्न शास्त्रानुसार, अशा स्वप्नाचा अर्थ होतो की, भविष्यात तुमचं उत्पन्न कमी होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
रात्री झोपताना अनेकवेळा तुम्ही अज्ञात ठिकाणाहून खाली पडताना पाहिलं असू शकतं. असं स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की, आपण एखाद्या गोष्टीबद्दल त्रस्त आहात आणि लवकरच काही समस्या येणार आहेत. स्वप्न शास्त्रानुसार, अशी स्वप्न पाहणं तुम्हाला येणाऱ्या काळाबद्दल इशारा देते. ज्यामुळे तुम्हाला भविष्याची जाणीव होते.